वांजरगाव येथील घटना
विनाकारण वाद घालून एका माथेफिरूने दोघांवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील वांजरगाव येथे शनिवारी सकाळी घडली. याप्रकरणी अबुबकर इसाक शेख (रा.वांजरगाव) याच्याविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव अशोक सोमासे (१९) व दीपक अरुण लहिरे (१९) हे वांजरगाव येथील रहिवासी आहेत. शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ते गावातील वेशीजवळ गप्पा मारत बसले होते. त्यावेळी गावातीलच अबुबकर इसाक शेख हा तेथे आला व त्याने त्यांच्याकडे खुनशी नजरेने बघून 'तुम्ही सगळे माजले आहे' असे म्हणून शिवीगाळ करून वैभव यास लोटलोट करू लागला.
यादरम्यान त्याने वैभववर चाकूने हल्ला केला. यावेळी वैभवचा मित्र दीपक हा देखील मध्ये पडला. त्याच्यावरसुद्धा अबुबकर याने हल्ला चढविला. या हल्ल्यात वैभव व दीपक हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी वैभव सोमासे याने दिलेल्या फिर्यादीवरून अबूबकर शेख याच्याविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाया स्त्रोत - गुगल