Reels | 'ती' रिल्स बनवित होती.. कार थेट दरीत कोसळली अन् क्षणार्धात सर्वकाही संपलं.!

0

३०० फूट दरीत कोसळली कार 


रिल्स बनविणे एका तरुणीच्या जिवावर बेतले. खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन येथील दत्तधाम मंदिर परिसरात मोबाईलवर रिल्स बनविणाऱ्या युवतीला आपला प्राण गमवावा लागला. कारमध्ये बसून रील्स बनवित असताना तिचा पाय क्लचवर पडण्याऐवजी  अॅक्सिलेटवर पडून कार थेट ३०० फूट दरीत जाऊन कोसळली अन् क्षणार्धात सर्व काही संपलं. ही घटना १७ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. 

 


 श्वेता दीपक सुरवसे (वय २३ वर्षे रा.हनुमाननगर, छत्रपती संभाजीनगर )  असे या मृत तरुणीचे नाव आहे. सेल्फी, रिल्स बनविणे आजकालच्या तरुणाईचा ट्रेंड बनला आहे. पर्यटनस्थळी हे बघायला मिळते. लोभस, विहंगम आणि निसर्गसौंदर्य दिसले की, तरुणाई रिल्स अथवा सेल्फी घेण्यासाठी जिवाची पर्वा करीत नाही. 


मृत श्वेता सुरवसे 


असाच प्रकार १७ जून रोजी घडला. त्याचे झाले असे की, श्वेता सुरवसे ही तिच्या मित्रासह छत्रपती संभाजीनगर येथून टोयटो इटिऑसमध्ये खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन येथे गेले. येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी गेल्यानंतर तिला तेथील निसर्गसौंदर्य बघून रिल्स बनविण्याचा मोह झाला. त्यामुळे तिने मित्राला सांगितले की, मी पण कार चालवून बघते. 


कार दरीत कोसळल्यानंतर तिचा असा चुराडा झाला. 

त्यानंतर तिने रिव्हर्स गिअर टाकून कार मागे घेत असतानाच तिचा पाय क्लचवर पडण्याऐवजी  अॅक्सिलेटर पडून कार मागे असलेल्या ३०० फूट दरीत जाऊन कोसळली. गाडी मागे जात असताना सर्वांना दिसत होती. परंतु क्षणार्धात सर्व काही घडल्याने तिला वाचविण्यासाठी कुणालाही प्रयत्न करता आले नाही. घटनेनंतर कारचा चुराडा होऊन श्वेताचाही मृत्यू झाला. या थरारक व भयावह घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top