Beating the Police | 'त्याने' पोलिसाच्याच 'श्रीमुखात' भडकावली; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

भांडण सोडवायला गेला होता कर्मचारी 


 भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या 'श्रीमुखात' भडकावून मारहाण केल्याची घटना ०७ जून रोजी वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारात घडली. दरम्यान शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या दोघा बापलेकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. 




           भागीनाथ खंडू साठे व सतीश भागीनाथ साठे (दोघे रा. जांबरगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवाजी कुऱ्हाडे हे वैजापूर पोलिस ठाण्यात चालक पदावर कार्यरत आहेत. दरम्यान शुक्रवारी 'डायल ११२'  क्रमांकावर कॉल आला व कॉलरने जांबरगाव येथील कांदा मार्केटसमोर मारहाण झाली आहे' अशी माहिती एका कर्मचाऱ्याने त्यांना दिली. यामुळे ते सोबत पोलिस शिपाई पंडुरे हे दोघेजण घटनस्थळी गेले. त्या ठिकाणी ११२ या क्रमांकावर कॉल करणारा कॉलर जनार्धन साठे (रा.जांबरगाव)  होता. 'माझे वडील व भाऊ कालपासून मला व पत्नीला मारहाण करत असून मी पोलिसांत तक्रार दिली आहे' असे पोलिसांना सांगितले. जवळच एका हॉटेलवर त्याचे वडील भागीनाथ साठे व त्याचा भाऊ सतीश साठे उभा होता. यावेळी पोलिसांनी त्या दोघांना बोलवले. 


या दरम्यान जांबरगाव येथील इसम भागवत साठे यांनी  'भांडण कशाला करता' असे समजावत असतानाच भागीनाथ यांनी त्यांच्या कानाखाली मारली. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी देखील भागीनाथ याला सौम्य भाषेत समजावत 'येथे भांडण करू नका, पोलिस ठाण्यात या व फिर्याद द्या. आम्ही कायदेशीर कारवाई' करू असे सांगत असताना भागीनाथ याने पोलिस कर्मचारी भिवाजी कुऱ्हाडे यांचा शर्ट ( सदरा) पकडून त्यांना शिवीगाळ करू लागला. दरम्यान काही समजण्याच्या आत त्याने कर्मचारी कुऱ्हाडे यांच्या श्रीमुखात भडकावली व जवळच पडलेल्या एका काठीने कुऱ्हाडे यांच्या पायावर मारहाण केली.  'तुम्हाला आता दाखवतोच, तुम्हाला काय करायचे ते करा. आम्ही जेलमध्ये जाण्यास तयार आहोत' असा दम देऊन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाया स्त्रोत - गुगल 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top