Loksabha Election | कामचुकारपणा भोवला, 'त्या' कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार

0

नियुक्तीपासून कर्तव्यावर नाही 

'


  निवडणूक कामासाठी गैरहजर राहणाऱ्या वैजापूर येथील पंचायत समिती कार्यालयातील एका कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहायक निवडणूक निर्णयाधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.





      याबाबत अधिक माहिती अशी की, येथील पंचायत समिती कार्यालयात कार्यरत वरिष्ठ लिपीक एस.जी. खोतकर यांची लोकसभा निवडणूक - २०२४  मध्ये तातडीचे सेवा म्हणून नियुक्ती करण्यात आली. परंतु संबंधित कर्मचारी हे नियुक्ती झाल्यापासून विनापरवानगी गैरहजर असून अद्यापपर्यंत हजर झालेले नाहीत. त्याचप्रमाणे त्यांना वेळोवेळी देण्यात आलेल्या नोटीसचा देखील खुलासा विहित कालावधीत सादर केलेला नाही. 


याशिवाय दूरध्वनी देखील स्वीकारत नाहीत. परिणामी टपाली मतपत्रिका कक्षमधील नियुक्त करण्यात आलेले एस. जी. खोतकर हे अनधिकृतरित्या गैरहजर आहेत. त्यामुळे सहायक निवडणूक निर्णयाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (वैजापूर) यांनी संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० चे कलम १३४/१ अन्वये प्रचलित कार्यपध्दतीचा अवलंब करून वैजापूर पोलिस ठाण्यात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून अहवाल सादर करावा. असे आदेश दिले आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top