नागरिकांमध्ये पसरवत होता दहशत
वैजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कृत्य करून नागरिकांत दहशत पसरविणाऱ्या गुंडाला एमपीडीएकायद्यातंर्गत एक वर्षासाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. राहुल गणेश शिंदे (२६ रा.वडारवाडा, वैजापूर) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे.
![]() |
राहुल शिंदे |
राहुल शिंदे याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात मागील काही दिवसांत बलात्कार, जबरी चोरी, दरोडा, विनयभंग, जबर दुखापत करणे, घातक शस्त्रांनी इच्छापूर्वक दुखापत करणे व चोरी करणे, असे शरिराविरुध्द व मालाविरुध्दचे असे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान त्याचा गुन्हेगारी आलेख हा वाढतच राहिला. त्यामुळे पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा व वैजापूर पोलिसांनी त्याच्याविरुध्द एमपीडीए कायद्यान्वये कारवाईसाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सादर केला.
या आधारे जिल्हाधिकारी स्वामी यांनी २६ एप्रिल रोजी राहुल शिंदे याच्याविरुध्द एमपीडीए अधिनियम १९८१ चे कलम ३ (१), ३(२) अन्वये स्थानबध्दतेचा आदेश पारित केला. त्यावरुन त्यास ०१ मे रोजी स्थानबध्दतेचे आदेश तामिल करून मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबध्द करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया (ग्रामीण ), अपर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. सतीश वाघ, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, नामदेव सिरसाठ, दीपेश नागझरे, संजय घुगे. वाल्मिक निकम संजय तांदळे, दीपक सुरोसे, प्रशांत गीते यांनी ही कारवाई केली.
0 Comments