महालगाव येथील भरदिवसाचा थरार
बॅंकेत रक्कम भरणा करण्यासाठी जाणाऱ्या पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापकास मारहाण करून लाखो रुपये लुटल्याची घटना २७ मे रोजी भरदिवसा सकाळी ११ वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे घडली घडली. भरदिवसा मोठी रक्कम लुटल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान लुटलेल्या रकमेबाबत मतमतांतरे असून नेमकी किती रक्कम लुटली गेली. याचा उलगडा अद्याप झाला नाही. परंतु असे असली तरी कुणी १७ लाख, कुणी ११ लाख रक्कम असल्याचे सांगितले. पोलिसांनी मात्र कोणताही दुजोरा दिलेला नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर - गंगापूर राज्य महामार्गावरील तालुक्यातील महालगाव येथे मंगेश गायकवाड यांचा पेट्रोलपंप असून या पंपावर गोरख सुनील धारबळे (२४ रा. कनकसागज) हा व्यवस्थापक म्हणून काम करतो. पेट्रोल व डिझेल विक्रीच्या माध्यमातून दोन दिवसांत जमा झालेली लाखो रुपयांची रक्कम तो २७ मे रोजी पंपावरून घेऊन तो दुचाकीने महालगावात बँकेत जात असताना गावाजवळच त्याला अडवून मारहाण करीत लाखो रुपये लुटून पोबारा केला. घटनेनंतर गोरख हा जागेवर बेशुद्ध पडल्याने त्याला गावातील काही नागरिकांनी वैजापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान सुनील याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून रक्कम लुटल्याचे काहींचे म्हणणे आहे तर दुसरीकडे असे काही झाले नसल्याचे एक मतप्रवाह आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळासह रुग्णालयात जाऊन सुनील याची भेट घेतली. परंतु तो अजूनही बोलायच्या स्थितीत नसल्याने घटनेचा नेमका उलगडा होऊ शकला नाही. रक्कम नेमकी किती लुटली? याचाही आकडा पोलिसांकडे नाही. त्यामुळे या घटनेचे गूढ कायम आहे. सुनील याने तणाव घेतल्यामुळे तो बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी प्राथमिक माहितीनुसार वीरगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
रक्कम १७ लाख १९ हजार
दरम्यान पेट्रोलपंपाचे मालक मंगेश गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार इंधन विक्रीपोटी दोन दिवसांत १७ लाख १९ हजार रुपये तर गोरख धारबळे याचे वडिल सुनील धारबळे यांच्या म्हणण्यानुसार ११ लाखांपेक्षा जास्त रक्कम होती. रकमेबाबत वेगवेगळे आकडे समोर येत आहे. परंतु असे असले तरी रकमेबाबत पोलिसांनी कोणताही दुजोरा दिलेला नाही.
निदर्शनास कसे आले नाही?
वैजापूर - गंगापूर राज्य महामार्गावर नेहमीच वर्दळ असते. याशिवाय पेट्रोलपंप गावाजवळच आहे. त्यामुळे भरदिवसा सकाळी एवढी मोठी घटना घडूनही कुणाच्या निदर्शनास कशी आली नाही? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मिरची डोळ्यात फेकून झटापटीत किमान काही मिनिटे जातात. घटनेनंतर आरडाओरड झाली नाही. घटनेनंतर गोरख हा थेट बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला असल्याचे असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलपंपासह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यातील फुटेज तपासणी करण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेसह वीरगाव पोलिसांकडून सुरू आहे. या फुटेजच्या तपासणीनंतरच या घटनेतील सत्य बाहेर येणार आहे. याशिवाय गोरख शुध्दीत येण्याची वाट पोलिस बघत असून त्याच्या जवाबानंतर प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे. प्रथमदर्शनी गोरख याच्या डोळ्यात मिरची फेकल्याचे दिसून येत नाही. या वृत्तास वैद्यकीय सूत्रांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे पोलिसांची संशयाची सुई सध्यातरी गोरख याच्या भोवतीच फिरत आहे.
0 Comments