Nandur Madhmeshwar Canal | 'त्यांनी' थेट कालव्यात उतरून केले आंदोलन

0

'नांमका'त आवर्तन सोडा 



नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून तात्काळ पाणी सोडण्यात यावे. या मागणीसाठी आधार शेतकरी जलदूत समितीच्यावतीने वैजापूर व गंगापूर तालुक्यातील शेतकरी व महिलांनी तीन मे पासून आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून वैजापूर व गंगापूर या दोन्ही तालुक्यातील शेतकरी व महिलांनी वैजापूर तालुक्यातील वक्ती गावातील कालव्यात उतरून बादली आंदोलन केले



वैजापूर तालुक्यातील व्यक्ती येथील कालव्यात शेतकऱ्यांनी आंदोलन केले.


समितीचे अध्यक्ष पंडित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोन्याबापू सिरसाठ, रामचंद्र पिलदे, योगेश तारू, सचिन गायकवाड, मंदा न्हावले आदींसह शेकडो शेतकरी व महिला या आंदोलनात सहभागी झाल्या असून दहा मे पर्यंत कालव्यातून पाणी न सोडल्यास १३ मे रोजी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. 



आंदोलनात महिलाही सहभागी झाल्या होत्या.


दरम्यान, नांदूर मधमेश्वर कालव्याचा देय कोटा तीन हजार ११८ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाल्याने व गोदावरी कालव्याचे मे महिन्याचे प्रस्तावित आवर्तनासाठी जेमतेम पाणी साठा शिल्लक असल्याने मागणीनुसार कोणताही पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याचे पाटबंधारे विभागाने आंदोलकांना कळवले आहे. त्यामुळे आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पाटबंधारे विभागाने हे प्रकरण धोरणत्मक निर्णय घेण्यासाठी शासनाकडे पाठवले आहे. शासनाच्या निर्देशांनंतरच कालव्यातून पाणी सोडण्यात येईल. असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top