Deportation | 'ते' दोघे अट्टल गुन्हेगार हद्दपार , समाजात माजवत होते दहशत

0

उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई 



वैजापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात दहशत माजविणाऱ्या दोघांना हद्दपारीचे तर अन्य दोघांना एक वर्षासाठी ५ हजार रुपयांचे मुद्रांक व तेवढ्याच किंमतीचा जामीनदार  देण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी दिले आहेत. याशिवाय एकावर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.





 याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयामार्फत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पाच जणांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता.  यातील समर्थ सुरेश मनोरे हा शहरातील दुर्गानगर परिसरातील रहिवासी असून त्याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यासह जबरी चोरी, दंगा व अन्य कलमान्वये एकूण ०४ गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामीनावर तुरुंगाबाहेर आलेला असून त्याच्या वृत्तीत काहीही फरक पडलेला नाही. म्हणून त्याला एक वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय सादिक युसूफ शेख हा तालुक्यातील लाडगाव येथील रहिवासी आहे. 


त्याच्याविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात अपहरण, पोस्को बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) , बलात्कारासह विविध  गुन्हे दाखल असून सध्या तो जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. परंतु त्याच्या वागणुकीत कोणताही बदल झालेला नाही. त्याच्यामुळे ग्रामीण भागातील महिला मुलींमध्ये असुरक्षितता वाढल्याने त्याला देखील एका वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. अन्य तिघांपैकी पोपट बाबुराव राऊत (रा.सिरसगाव) व प्रवीण कारभारी त्रिभुवन (रा. चोरवाघलगाव) या दोघांकडून ५ हजारांचा बॉंड व तितक्याच किंमतीचा जमीनदार घेण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय दीपक शामसिंग महेर (रा. शास्त्रीनगर, वैजापूर). हा सध्या कर्करोगाने ग्रस्त असून उपचार घेत आहे. त्याच्याकडे पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवावे. असे आदेशीत केले आहे.


छाया स्त्रोत - गुगल 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top