Loksabha Election Analysis | आमदार बोरनारे चिकटगावकरांना पडले 'भारी'

0

चिंचडगावात जास्त तर चिकटगावात कमी मतदान 



यंदाची लोकसभा निवडणूक अटीतटीची ठरली. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनासह विविध पक्षांचे राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी मोठे प्रयत्न केले. टक्केवारी वाढविण्यासाठी भर दिला असला तरी मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा केवळ चार टक्के जास्त मतदान करून घेण्यातच यश आले. विधानसभा मतदारसंघातील नेते व पदाधिकाऱ्यांच्या गावांतही मतदानाचा टक्का फारसा वाढला नाही. दरम्यान आपापल्या गावांत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शिंदेसेनेचे  विद्यमान आमदार रमेश बोरनारे  उबाठा शिवसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांना 'भारी' भरले आहे. या दोघांच्या अनुक्रमे चिंचडगाव व चिकटगावात मतदानाचा मोठा फरक पडला आहे. बोरनारेंनी मतदान करून घेण्यात चिकटगावकरांना 'मात' दिली आहे.

 

 



लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. शिंदेसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे, एमआयएमचे इम्तियाज जलील व उबाठा शिवसेनेचे चंद्रकांत खैरे या तिघांमध्ये जोरदार रस्सीखेच झाली. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षांच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान कसे करून घेता येईल. यावर भर दिला. परंतु असे असले तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का फारसा वाढला नाही. त्यामुळे मतदारांचा हा निरुत्साह म्हणायचा की राजकीय पक्षांच्या नेत्यांसह प्रशासनाचे अपयश? असा प्रश्न नक्कीच पडतो. एप्रिल महिन्यात उन्हाच्या तडाख्याने सर्व हैराण होते. परंतु मतदानाच्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे उन्हाने थोडी विश्रांती घेतली होती. अशा परिस्थितीत मतदानाचा टक्का वाढणे अपेक्षित असतानाही तसे झाले नाही.


 शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या चिंचडगावगावात ७३.१२ टक्के मतदान झाले. उबाठा शिवसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या चिकटगावगावात ५६ टक्के मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाऊसाहेब ठोंबरे यांच्या 'होमपीच' असलेल्या पुरणगावात ६३.०३ टक्के मतदान झाले. येथे १०३६ पैकी ६५३ मतदारांनी मतदान केले. शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख  बाबासाहेब जगताप यांच्या भऊर गावात ७०.७४ टक्के मतदान झाले. उबाठा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे यांच्या महालगावात ६५.३८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शिंदेसेनेचे बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव यांच्या भटाणा गावात ७३.२३ टक्के मतदारांनी मतदान केले. उबाठा शिवसेनेचे  उपजिल्हाप्रमुख संजय निकम यांच्या टुणकी गावात ६५.४१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 


निवडणुकीतील उमेदवार डॉ. जीवन राजपुत यांच्या बेंदवाडी गावात केवळ ६६.३८ टक्के मतदान झाले. भाजपचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य एकनाथ जाधव यांच्या शिऊर गावात ६१.३४ टक्के मतदान झाले. त्यांचे बंधू तथा उमेदवार जे. के. जाधव याच गावातील रहिवासी आहेत. उबाठा शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख ॲड रमेश सावंत यांच्या नगिनापिंपळगाव गावात ६७.५१ टक्के मतदान झाले. उबाठा शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख ॲड. आसाराम रोठे यांच्या राहेगावात सर्वाधिक म्हणजे ८२.७९ टक्के मतदान झाले. 


राहेगाव केंद्रावर सर्वाधिक तर डीएड कॉलेजवर सर्वात कमी 


 लोकसभा निवडणुकीत वैजापूर विधानसभा मतदारसंघात ६४.८० टक्के इतके मतदान झाले. मतदारसंघात १ लाख ६२ हजार ३४६ पुरूष,१लाख ४७ हजार ६६९ ,अन्य २ असे एकूण ३ लाख १० हजार १७ इतके मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ११ हजार ५८३ पुरूष व ८९ हजार २९९ स्त्रिया अशा एकूण २ लाख ८८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वात कमी मतदान हे वैजापूर शहरातील डीएड काॅलेज मतदानवर (केंद्र क्रमांक १८९) झाले. या केंद्रावर अवघे ४६.०६ टक्के मतदान झाले तर सर्वात जास्त मतदान तालुक्यातील राहेगाव मतदान केंद्रावर (क्रमांक ९८) झाले. या केंद्रावर ८२.७९ टक्के इतके मतदान झाले.डीएड काॅलेज मतदान केंद्रावर ४४० पुरुष व ४४८ स्त्रिया असे एकूण ८८८ मतदार आहेत.या केंद्रावर पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त होती. त्यातील २२२ पुरुष १८७ महिला अशा एकूण ४०९ म्हणजेच ४६.०६ टक्के मतदारांनी मतदान केले. राहेगाव मतदान केंद्रावर २६२ पुरुष व २३२ महिला असे एकूण ४९४ मतदार होते. त्यापैकी २३३ पुरुष व १७६ महिला असे एकूण ४०९ मतदारांनी मतदान केले. 


 ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान 


वैजापूर विधानसभा मतदारसंघात ७ मतदान केंद्रावर ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले तर ५ मतदान केंद्रावर ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. तालुक्यातील वाकला ( क्रमांक ५ अ)-४७.७८, चिकटगाव (३३) - ४९.९३, सावित्रीबाई फुले विद्यालय, वैजापूर (१७६) -४९.२१, जिल्हा परिषद बांधकाम कार्यालय, वैजापूर (१८७) -४७.०७, जिल्हा परिषद प्रशाला (मुलांची) वैजापूर (१९६) -४८.६८ व डीएड काॅलेज, वैजापूर (१९२) ४८.८५ या सात मतदान केंद्रावर ५० टक्पेक्यांपेक्षा कमी मतदान झाले तर रामवाडी (२५) -८१.९२,वडजी (७०A)- ८१.८९,राजुरा (९७) -८१.५५,मकरमतपूरवाडी (१३०)-८१.०७, राहेगाव मतदान केंद्रावर ८२.७९ या पाच मतदान केंद्रावर ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top