Rape Of Women | 'ती' शेतात कापूस वेचत होती अन् 'त्या' दोघांनीही तिच्यावर...!

0

हडसपिंपळगाव येथील खळबळजनक घटना 



 

शेतात कापूस वेचणी करीत असलेल्या महिलेवर दोघांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना ५ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील हडसपिंपळगाव येथे घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात बलात्कारासह अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 




   याप्रकरणी अंबादास नांगरे ( रा.हडसपिंपळगाव) व अन्य एका अनोळखी विरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील पीडित महिला ही ०५ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हडसपिंपळगाव शिवारातील शेतात कापूस वेचणी करीत होती. यावेळी हडसपिंपळगाव येथीलच अंबादास नांगरे याच्यासह अन्य एकजण तेथे आला.



 दरम्यान अंबादास याच्यासोबत आलेल्यानेही पीडितेवर अत्याचार केला तर त्यानंतर अंबादास यानेही तिच्यावर अत्याचार केला. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी  महिलेने वैजापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी रात्री उशिरा दोघांविरुद्ध  बलात्कारासह व अॅट्राॅसिटी ( अनुसूचित जाती - जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) व विविध कलमान्वये  वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी करीत आहेत.

छाया स्त्रोत - गुगल 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top