Accident | माॅर्निंग वाॅक जिवावर बेतले, अपघातात महिला ठार

0

 

दुचाकीने दिली धडक 




 मार्निंग वाॅकसाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वृध्देला दुचाकीने धडक दिल्याने ती ठार तर अन्य एकजण जखमी झाल्याची घटना ३ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास वैजापूर शहरालगतच्या लाडगाव चौफुलीवर घडली. दरम्यान दुचाकीने धडक दिली. हे जरी खरे असले तरी धडक दिल्यानंतर तिला ह्रदय विकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. असेही काहींचे म्हणणे आहे. 




अपघातानंतर दुचाकींची झालेली अवस्था 




 पुष्पाताई भास्कर इंगळे ( वय ६० रा. इंगळेवस्ती वैजापूर) असे अपघात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पुष्पाताई  सकाळी पायी फिरण्यासाठी पावणेसहा वाजेच्या सुमारास लाडगाव रस्त्यावरून लाडगाव चौफुलीच्या दिशेने येत असताना लाडगावहून वैजापूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने (क्रमांक एम. १२ बी. सी. ९६७८)  त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत त्यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.



मृत पुष्पाताई इंगळे



अपघातानंतर  रुग्णवाहिकेव्दारे त्यांना  वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल  करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दरम्यान धडकेनंतर त्यांना ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. अशीही चर्चा आहे. त्यामुळे नेमका खरा प्रकार काय आहे? हे पोलिस तपासातच समोर येणार आहे. दरम्यान याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top