Voter Awareness | चल गं करु मतदान, लावू बोटाला शाई ! जिल्हाधिकाऱ्यांच्या उखाण्याने रंगत

0

उपक्रमांनी दुमदुमली वैजापूरनगरी



माझा देश माझी लोकशाही, चल गं…. करु मतदान, लावू बोटाला शाई’, या उखाण्यातून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी श्रोतृवर्गाला मतदानाची महती सांगितली. स्वीप उपक्रमातर्गंत जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत वैजापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मतदार जनजागृतीच्या घोषणांनी वैजापूरनगरी दुमदुमून गेली. 




जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत वैजापूर येथे मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. 


 उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी, तहसिलदार सुनिल सावंत तसेच इतर मान्यवर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सकाळी आठ वाजेपासून शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यात सर्व शासकीय अधिकारी- कर्मचारी,अंगणवाडी सेविका, शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.रॅलीत लेझीम पथकाचाही समावेश होता. मतदार जनजागृतीच्या घोषणा देऊन शहर दणाणून गेले. डीएड कॉलेजच्या प्रांगणामध्ये रॅलीचा समारोप झाला. तेथे  विविध कार्यक्रमांनी मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात आला.




 अव्वल कारकून दीपक त्रिभुवन  यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. एका संचाने अतिशय सुंदर पोवाडा सादर करत मतदानाची महती सांगितली. मतदार जागृती संदेश देणाऱ्या उखाण्यांच्या कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी स्वतः उखाणा सादर केला. त्यांनी घेतलेल्या ‘माझा देश माझी लोकशाही चल गं… करु मतदान लावू बोटाला शाई’ या उखाण्याला उपस्थितांनी दाद दिली. याप्रसंगी राजश्री बंड, सुवर्णा बोर्डे, दीपक त्रिभुवन, सुचिता हरेगावकर, उर्मिला जेजुरकर,सुरेखा पोटे, कमल खरे, नाजुका गायकवाड, केशव सूर्यवंशी आदींनी उखाणे सादर केले. तलाठी श्रीमती हिंगे यांनी एकपात्री  प्रयोग सादर करून लोकशाहीची भावना व्यक्त केली. 





 जिल्हाधिकारी  म्हणाले की, मतदानाप्रति कर्तव्य भावना जागरुक व्हायला हवी. आपल्या देशाची लोकशाही बळकट करायची तर मतदानाचे प्रमाण वाढले पाहिजे. त्यासाठी लोकांना मतदान केंद्रांवर विविध सुविधांची उपलब्धता करुन दिली जाणार आहे. त्यात पाणी, सावली, लहान बालकांसाठी पाळणाघर, दिव्यांगांसाठी व्हील चेअर, मेडिकल किट आदी विविध सुविधांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. कुणीही मतदानापासून वंचित राहू नये. हे आयोगाचे ध्येय्य आहे. तथापि, सगळ्यांना मतदान करता यावे यासाठी मतदार सहायता केंद्रही स्थपन करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी वैजापूर विधानसभा मतदारसंघ निहाय निवडणूक तयारीचा आढावाही घेतला. यावेळी सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top