दोन लाखांचा ऐवज लंपास
वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे बंद घरात घुसून चोरट्यांनी रोख रकमेसह १ लाख ९९ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना १३ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वंदना बागुल या तालुक्यातील खंडाळा येथे रहिवासास आहेत. शुक्रवारी रात्री त्या व कुटुंबातील अन्य सदस्य हे गीतगायनाच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घरात घुसून लाकडी कपाटात असलेली ९९ हजारांची रोकड, ८० हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी, २० हजारांची सोन्याची ठुशी असा एकूण १ लाख ९९ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.
ही घटना शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास बागुल कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यानंतर लगेचच त्यांनी वैजापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. वंदना बागूल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाया स्त्रोत - गुगल