Atrocity | विनयभंग करून 'त्या' दोघांनी 'तिची' झोपडी जाळली !

0

भालगाव येथील घटना 



 एका २५ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिची झोपडी जाळून टाकणाऱ्या दोन जणांविरुद्ध विनयभंगासह ,ॲट्राॅसिटी व अन्य विविध कलमान्वये वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वैजापूर तालुक्यातील भालगाव येथे बुधवारी रात्री घडली असून गुरुवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






जालिंदर चांगदेव शिंदे व प्रभाकर पंढरीनाथ शेळके ( दोघे रा. भालगाव ) अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेतील फिर्यादी महिला व आरोपी हे गावात शेजारी - शेजारी राहतात. महिला ही घरासमोर असताना जालिंदर शिंदे याने तिच्याकडे बघत लघुशंका करून तिचा विनयभंग केला. या कारणावरून दोन्ही कुटुंबीयात वाद झाला. 



या वादातून जालिंदर शिंदे व प्रभाकर शेळके या दोघांनी महिलेची राहत असलेली झोपडी जाळून टाकली. या आगीत झोपडीतील महिलेची रोख रक्कम, मोबाईल व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध  विनयभंगासह ॲट्राॅसिटी ( अनुसूचित जाती - जमाती प्रतिबंधक कायदा) व अन्य विविध कलमान्वये वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी  करीत आहेत.

छाया स्त्रोत - गुगल 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top