Shortcut to make money | पैसे कमाविण्याचा 'शाॅर्टकट' अंगलट; 'ते' दोघेही 'सधन' कुटुंबातील 'चोर'

0

नागरिकही झाले आश्चर्याचकित



 

छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन दुचाकी चोरांचा नुकताच पर्दाफाश त्यांच्याकडूनच १४ दुचाकी हस्तगत केल्या. या प्रकरणात जी नावे समोर आली. त्याने वैजापूर तालुक्यातील नागरिक चांगलेच हादरले आहेत. मास्टर माईंड हा एका राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी तर त्याचा साथीदार हा सधन कुटुंबातील आहेत. हे दोघेही चांगल्या कुटुंबातील असतानाही त्यांनी असे पाऊल का टाकले असावे?असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.


 





अजिंक्य उर्फ लाल्या बोडखे (१९ रा.बोरसर कारखाना )  व दीपक काकासाहेब जगताप रा.शिवराई रस्ता, वैजापूर) या दोघांना पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पकडून त्यांच्याकडून तब्बल १४ दुचाकी हस्तगत केल्या. दोघांनी वैजापूरसह येवला व शिर्डी येथून दुचाकी चोरून विक्री केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.पोलिस तपासात बहुतांश गोष्टींचा उलगडा झाला आहे. अजिंक्य हा दुचाकी चोरून आणायचा तर दीपक हा त्या दुचाकी विक्री करायचा. मास्टर माईंड दीपक जगताप हा तसा चांगल्या कुटुंबातील असून त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्ष पदावर काम केलेले आहे.याशिवाय त्याची एक पतसंस्था होती. त्याच्या चेअरमन पदावरही होता. तसेच बोरसर कारखाना येथील त्याचा साथीदार अजिंक्य बोडखे हाही सधन कुटुंबातील असून त्याला २० एकर शेती आहे. दोघेही सधन कुटुंबातील असतानाही या चोऱ्यांच्या चक्करमध्ये ते कसे गुरफटले गेले? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. 



दीपक राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे त्याची चांगल्या लोकांमध्ये उठबैस होती. पक्षात असताना तो दरम्यानच्या काळात चांगला सक्रिय होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून तो विजनवासात असल्यासारखा होता. त्याच्या चोऱ्यांचे कांड पोलिसांनी उघड केले अन् अनेकांना धक्का बसला. अल्पावधीत पैसे कमवून मोठे होण्याचा 'शाॅर्टकट' किती महागात पडू शकतो ? याची प्रचिती दोघांना तर आलीच नागरिकांनीही बोटे तोंडात घालून त्यांना धक्का बसला आहे. वास्तविक पाहता उदरनिर्वाह होईल एवढी साधने त्यांच्याकडे उपलब्ध होती. परंतु केवळ 'हव्यासापोटी' कुटुंबातील सदस्यांची पर्वा न करता आयुष्य धोक्यात घालून ही जोखीम पत्करली. ज्यावेळी स्थानिक पोलिसांसमोर ही नावे आली. तेव्हा त्या़चाही क्षणभर विश्वास बसेना. या धंद्यातून तात्पुरते पैसे मिळालेही असतील. परंतु त्याचा आनंद फार टिकला नाही. 



गेल्या काही दिवसांपासून वैजापूर शहर व परिसरात दुचाकी चोरींची मोठ्या प्रमाणात बोंबाबोंब झाली. विशेष म्हणजे या दोघांनी चोऱ्या करण्यासाठी बाहेरच्या तालुक्यासोबतच वैजापूर हे त्यांचेच 'होमपीच'ही निवडले. होमपीच काय अन् दुसरा तालुका काय? पकडले तर कधीही गेलेच असते. गुन्हेगार कितीही शातिर असो. एक ना एक दिवस तो पोलिसांच्या जाळ्यात अडकरणारच. हे मात्र सत्य आहे. यापूर्वी चोऱ्या करणाऱ्यांमध्ये अनेकजण सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. परंतु कालची घटना काही अर्थाने थोडीशी वेगळी आहे. घरात सर्व काही असूनही केवळ पैशांच्या हव्यासाठी या चोरीच्या 'धद्यात' हे दोघे नशीब आजमावत होते. झटपट मोठे होण्यासाठी त्यांनी वापरलेला हा 'शाॅर्टकट' आत्मघातकी आहे. हे या दोघांना कळालेच नाही. परिणामी पोलिसांच्या जाळ्यात अडकून चांगल्या आयुष्याची वाताहत करून घेतली. ही बाब त्यांच्या कुटुंबीयांना क्लेशदायक ठरणारी आहे. यश अथवा पैसे कमविण्याला 'शाॅर्टकट' नसतो. हे पुन्हा एकदा या घटनेवरून सिद्ध झाले आहे.


आयपीएलवर सट्टा


झटपट श्रीमंत होण्यासाठी या तरूणांनी दुचाकी चोरी करून विकण्याचा शॉर्टकट निवडला. पण ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. अशीच मानसिकता आज ग्रामीण भागात दिसून येत आहे. सध्या आयपीएल सुरू असून अनेक तरूण आयपीएलवर सट्टा लावताना कंगाल झाले आहे. एक कोटीपर्यंत पैसे मिळण्याचे आमिष वेगवेगळ्या अपवर दाखवले जात असून ही तरूण मंडळी यामध्ये दिवसेंदिवस गुरफटत असून त्यातून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आयपीएलवर सट्टा खेळणारे अनेक बड्या घरातील मुलं असून त्यांना वेळीच रोखण्याची पालकांची जबाबदारी आहे.


छाया स्त्रोत - गुगल 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top