Disqualified | प्रमाणापत्रावर सही केली अन् सरपंच पद गेले.!

0

खंडाळ्याच्या सरपंच अपात्र



वैजापूर तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचास स्वाक्षरी प्रकरण चांगलेच अंगलट आले. वारस प्रमाणापत्रावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार नसतानाही त्यांनी स्वाक्षरी केल्यामुळे विभागीय आयुक्तांनी त्यांना येथून पुढच्या कालावधीसाठी अपात्र घोषित केले आहे. वैजापूर तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायत मोठी म्हणून ओळखली जाते. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान गटविकास अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या चौकशी अहवालाच्या आधारे दाखल केलेला प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अमान्य करून खोटी धारणा व संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.






कौशाबाई चांगदेव थोरात असे या अपात्र सरपंचाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथील रवींद्र गाडेकर यांनी खंडाळ्याच्या सरपंच कौशाबाई थोरात यांनी नियमबाह्य वारस प्रमाणापत्र बनवून दिल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करून अपात्र घोषित करण्यात यावे.अशी तक्रार अतिरिक्त आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुख कार्यकारी अधिकाऱ्यांचाही अहवाल त्यांना प्राप्त झाला. 


दरम्यान  मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सरपंच तथा  प्रतिवादी कौशाबाई चांगदेव थोरात यांच्या विरोधातील वैजापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाआधारे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम,१९५८ चे कलम ३९(१) अन्यये कार्यवाही करण्याबाबतचा दाखल केलेला प्रस्तावाबाबत  मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची धारणा खोटी व संशयास्पद असल्याचे  म्हटले आहे. 


प्रतिवादी कौशाबाई चांगदेव थोरात यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या कालावधीत केलेली नियमबाह्य कृती महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम ३९(१)  मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कृतीबद्दल दोषी आढळून आाले असल्यामुळे त्यांना ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावरून सांप्रत ग्रामपंचायतीच्या उर्वरीत कालावधीसाठी अपात्र घोषित करण्यात येत आहे.तसेच प्रकरण या न्यायालयात बंद करण्यात आले असल्याचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांनी या आदेशात म्हटले आहे.


'ती मी नव्हेच'


सरपंचांना अधिकार नसताना  बनावट वारस प्रमाणपत्र बनवून दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या सुनावणीत सरपंचांनी  माझी स्वाक्षरी त्या वारस प्रमाणपत्रावर नसून ती दुसरी कोणी केल्याचे म्हटले आहे. तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मी त्या दिवशी उपस्थित नव्हतो म्हणत अन्य सरपंच स्वाक्षरीचे काही पुरावे सादर केले असता ती स्वाक्षरी सारखीच असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भविष्यात चुकीच्या कामात तसेच बेकायदेशीर पद्धतीने काम होऊ नये म्हणून कौशाबाई थोरात यांना उर्वरित ग्रामपंचायत कालावधीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top