The Burning Truck | धावत्या ट्रकला आग, राष्ट्रीय महामार्गावरील थरार.!

0

येवला रस्त्यावरील घटना



 बारदान्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक आग लागून पेट घेतल्याची घटना १७ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वैजापूर शहरातून जाणाऱ्या नाशिक - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील बन्सीलालनगर परिसरात घडली. दरम्यान आजूबाजूच्या नागरिकांनी पाण्याचे टँकर आणून आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला. 



वैजापूर शहरात धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याने नागरिकांनी टॅंकरच्या पाण्याच्या साह्याने आग विझवली.


   याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर येथून बारदान भरून ट्रक लासलगावकडे जात असताना येवला रस्त्यावरील विनायकराव पाटील महाविद्यालयाजवळ ट्रकच्या पाठिमागून धूर निघायला सुरवात झाल्याचे चालकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने क्षणाचा विलंब न करता ट्रक वळवून पुन्हा मागे बन्सीलालनगरमध्ये आणून उभा केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी टँकरच्या पाण्याच्या साह्याने ही आग आटोक्यात आणली. 


शंकर वाणी, श्रीकांत साळुंके, प्रतिक वाणी, अमोल वाणी, रावसाहेब वाणी, धनंजय वाणी, शुभम कुमावत, मनोज होंड व अन्य नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आग विझविल्यानंतर अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत मोठ्या प्रमाणावर बारदाना खाक होऊन ट्रकचेही नुकसान झाले. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top