Teasing | 'त्याने' फोटो व्हायरल केले अन् 'तिने' विहिरीत उडी घेतली

0

जांबरगावातील घटना, गुन्हा दाखल 




 

अल्पवयीन मुलीचे छायाचित्र समाज माध्यमावर व्हायरल ( प्रसारित) केल्याने मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारात १३ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान या घटनेतील मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 




मृत अपेक्षा जाधव 


 अपेक्षा रामेश्वर जाधव (१५ रा.जांबरगाव) असे घटनेतील मृत मुलीचे नाव आहे तर  रोहित संजय साळवे ( २४ रा.चिंचडगाव ) व जांबरगाव येथील एका अल्पवयीन मुलाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अपेक्षा जाधव ही वैजापूर तालुक्यातील जाबंरगाव येथे कुटुंबीयांसह रहिवासास होती. ती वैजापूर येथील एका शाळेत  इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. शाळेत ती बसने जात असे. ११ एप्रिल रोजी तिने तिच्या भावाला 'रोहित नावाचा मुलगा हा माझी छेड काढत असल्याचे सांगितले'.



 तिच्या भावाने देखील ही बाब वैजापूर येथील नातलगांना सांगितली. दरम्यान रोहित साळवे हा जुन्या बसस्थानकासमोर असलेल्या डॉ. बोरा यांच्या दवाखान्यात कामाला असल्याची माहिती नातलगांना मिळाली. त्यामुळे ते त्या ठिकाणी रोहितला समजवयाला गेले. परंतु तिथे गेल्यानंतर रोहितसह अन्य एकाने नातलगांना मारहाण केली. यावेळी दवाखान्यातील डॉक्टराने 'येथे भांडण करू नका' असे म्हणून रोहितला दवाखान्यात नेले व नातलगांना बाहेर काढून दिले. यानंतर ही बाब तिच्या वडिलांना माहीत झाली. १२ एप्रिल रोजी अपेक्षा हिने वडिलांना सांगितले की, आम्ही शाळेतून घरी येत असताना जांबरगाव येथील अल्पवयीन मुलगा तिला म्हटला की, तू रोहित साळवे याच्यासोबत फोनवर व्हिडिओ कॉलवर बोल अन्यथा तुझ्या भावाला जीवे ठार मारेल अशी धमकी दिली. 



त्यामुळे मी रोहित याच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला त्याने व्हिडिओ कॉल दरम्यान स्क्रीनशॉट काढले असून 'त्या' मुलाने मला रोहितशी फोनवर बोल अन्यथा त्याला वैजापूरला जाऊन भेट असे म्हटला. जर तू त्याला भेटली नाही तर तो स्क्रीनशॉटचे फोटो संपूर्ण गावामध्ये व्हायरल करणार आहे' अशी धमकी दिल्याचे सांगितले. दरम्यान अपेक्षाने त्याच्याशी बोलण्यास नकार दिल्याने रोहित साळवे याने तिचे फोटो मित्रांच्या ग्रुपवर व्हायरल केले. या घटनेनंतर झालेल्या बदनामीमुळे  शनिवारी सकाळी सात वाजता अपेक्षा हिने तालुक्यातील जांबरगाव येथील शेत गट क्रमांक २०३ मधील शेतातील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी दोघांविरुद्ध वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top