Murder | 'तिचा' गळा आवळून खून केला.. मृतदेह गोणीत टाकला अन् नंतर धरणात फेकला !

0

अनैतिक संबंधातून झालेली घटना 



 

अनैतिक संबंधातून गळा आवळून एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह गोणीत भरून फेकून दिल्याची घटना वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे घडल्याचे उघडकीस आली. पोलिस तपासात या बाबींचा खुलासा झाला आहे. दरम्यान याप्रकरणी महिलेच्या दोन मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.


 


मृत सविता धनेश्वर 


सविता अरूण धनेश्वर (२७ रा. शिऊर ) असे मयत महिलेचे नाव आहे. सविता ही १९ एप्रिलपासून बेपत्ता होती. याप्रकरणी २० एप्रिल रोजी शिऊर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी सविता हिचा गोणीत भरलेला कुजलेला मृतदेह वैजापूर तालुक्यातील भटाणा येथील  ढेकु मध्यम प्रकल्प धरणाच्या परिसरात गवतात आढळून आला होता . घटनेची  माहिती मिळताच शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे , पोलिस उपनिरीक्षक चेतन ओगले, हवालदार राहुल थोरात,आघाडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 


दरम्यान अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. या प्रकरणात पोलिसांनी समाधान पोपट गायकवाड (२७) व अजय माणिक शिंदे (२२) दोघे  रा. शिऊर या दोन जणांना अटक केली आहे. समाधान व सविता या दोघांचे अनैतिक संबंध होते. १९ एप्रिल रोजी रात्री अजय शिंदे यांच्या घरात दोघांमध्ये वाद झाला. या वादात समाधान याने गळा आवळून सविता हिचा खुन केला. तसेच समाधान व अजय शिंदे या दोघांनी गोणीत मृतदेह भरून भटाणा प्रकल्पाच्या गवतात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top