Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Fraud | मक्याचे 'त्याने' साडेसहा लाख हडपले, गुन्हा दाखल

सवंदगावच्या शेतकऱ्याची फसवणूक 



 

मका खरेदीपोटी कंपनीकडून घेतलेले पैसे शेतकऱ्याला न देता परस्पर हडप करणाऱ्या एका एजंटाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात १२ एप्रिल रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





      शेख नदीम रा. जालना असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एजंटाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सिध्दनम व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड  कंपनी देशात विविध पिकांचे व अन्य वस्तू पदार्थांची आयत-निर्यात करण्याचे काम करते. कार्तिक गुरुराजन राव (रा. तेलगांना) हे मागील दीड वर्षांपासून या कंपनीत ट्रेडिंगचे काम करतात. दरम्यान  दीपक भोसले (रा.जालना) यांच्या माध्यमातून कार्तिक राव यांची जालना येथील कोमल इंडस्ट्रीजचा शेख नदीम याच्याशी ओळख झाली. यानंतर त्यांनी नदीमच्यामार्फत वैजापूर तालुक्यातील सवंदगाव येथील एका शेतकऱ्याकडून २० रुपये ६५ पैसे दराने ३० टन मका खरेदीचा करार केला. ही मका भरण्यासाठी नदीमने सवंदगाव येथे वाहन पाठवले. 



यावेळी कार्तिक राव यांचे सहकारी बबलेश कुमार (रा.राजस्थान) यांनी ०३ व ०४ एप्रिल त्यांच्या फोन-पे क्रमांकावरून नदीम याच्या फोन-पे क्रमांकावर १९ हजार ९९० रुपये पाठविले. याशिवाय कंपनीच्या बॅंक खात्यातून देखील नदीम याच्या कोमल इंडस्ट्रीज नावाच्या बँक खात्यावर ६ लाख ३९ हजार २४२ रुपये असे एकूण ६ लाख ५९ हजार २४२ रुपये इतकी रक्कम त्याला पाठवली. तोपर्यंत त्याने पाठविलेल्या वाहनात मका भरण्यात आली. परंतु मका भरल्यानंतर शेतकऱ्याला पैसेच मिळाले नाही. त्यामुळे त्याने ते वाहन जागेवरून हलू दिले नाही. 



याबाबतची माहिती मिळताच कार्तिक राव त्या ठिकाणी आले. परंतु 'पैसे मिळाल्याशिवाय वाहन जाऊ देणार नाही' असे शेतकऱ्याने त्यांना सांगितले. कार्तिक राव यांनी नदीम यास संपर्क करून 'शेतकऱ्याचे पैसे द्या' म्हणून सांगितले. परंतु त्याने त्यांना फोनवरून उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली.अखेर ती मका शेतकऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याला विक्री केली. या घटनेनंतर कार्तिक राव यांनी वैजापूर पोलिस ठाणे गाठत शेख नदीम  याच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


छाया स्त्रोत - गुगल 

Post a Comment

0 Comments