५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
वैजापूर शहरालगतच्या एका शेतवस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले तर कारवाई दरम्यान एकाने तेथून धूम ठोकली. ०८ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी ४ लाख ९५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
वैजापूर शहरालगतच्या गायकवाडवाडी परिसरात पोलिसांनी आठ जुगाऱ्यांना पकडले. |
याप्रकरणी संदीप सुरेश गायकवाड, रवी पोपट गायकवाड, अशोक मुरलीधर जमधडे, संतोष विठ्ठल गायकवाड (सर्व रा. गायकवाडवाडी, वैजापुर ग्रामीण-१), योगेश मच्छिंद्र निकम रा. घायगाव, योगेश मच्छिंद्रनाथ जेजुरकर (रा. नवजीवन कॉलनी, गंगापूर रोड), विशाल उत्तम गायकवाड (रा.भिलहाटी, स्वस्तिक टॉवर जवळ) गोरक्षनाथ रंभाजी जाधव (रा.आगरसायगाव) व शंकर नारायण गायकवाड (रा.गायकवाडवाडी) या नऊ जणांविरुद्ध वैजापूर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरालगत असलेल्या गायकवाडवाडी (वैजापूर ग्रामीण १) येथील शेतातील झाडाखाली मोकळ्या जागेत काही जुगारी झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना खबऱ्यामार्फत मिळाली.
माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील यांच्यासह हवालदार अविनाश भास्कर, ज्ञानेश्वर शिंदे आदींच्या पथकाने सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला असता जुगार अड्डा सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पोलिस आल्याचे समजताच शंकर गायकवाड याने तेथून पळ काढला तर अन्य आठ जणांना पोलिसांनी पकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व मोटारसायकली असा एकूण ४ लाख ९५ हजारांचा ४९० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला घेतले.