Elderly Voters | 'या' विधानसभा मतदारसंघात 'एवढे' वृध्द मतदार, शंभरी पार केलेल्यांची संख्या २१६

0

शंभरी गाठलेल्यांची संख्या २१



 वैजापूर विधानसभा मतदारसंघात वयाची पंच्याऐशी ते शंभरी पार केलेल्या मतदारांची संख्या पाच हजार ५३१ आहेत. शंभरी पार केलेल्या मतदारांची संख्या २१६ आहेत तर शंभरी गाठलेल्या मतदारांची संख्या २१ आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत यापैकी फक्त ७१ मतदारांनी घरून मतदान करण्याची सहमती दर्शविली आहे. 






भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांंपेक्षा जास्त आयुर्मान असलेल्या वृध्द व ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग मतदारांसाठी घरून मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार बीएलओंनी अशा मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. वैजापूर विधानसभा मतदारसंघातील ७१ वृध्द व २९ दिव्यागांनी घरूनच मतदान करण्याची सहमती दिली आहे. मतदारसंघात वयाची ८५ ते १०० वर्षे पार केलेल्या मतदारांची संख्या एकूण पाच हजार ५३१ तर दिव्यांग मतदारांची संख्या साडेतीन हजाराच्या जवळपास आहे. अशा मतदारांची  निवडणूक विभागाने स्वतंत्र यादी केली आहे. 


संबंधित अधिकारी व कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन त्यांना अजूनही पर्याय देत आहे. जास्तीत जास्त मतदान होऊन मतदानापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून प्रशासन प्रयत्नशील आहेत. मतदारसंघात शंभरी पार केलेले २१ मतदार आहेत तर वयाची १०१ पार केलेले ५७, १०२ पार केलेले ११,१०३ पार केलेले ७ व १०४ पार केलेल्या मतदारांची संख्या १४१ आहे. घरूनच मतदान करण्याचा पर्याय निवडलेल्या मतदारांची संख्या पाहता अत्यल्प आहे. याचाच अर्थ उर्वरित मतदार मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावतील. असा होतो. निवडणूक विभागाकडून अशा मतदारांच्या अजूनही घरोघरी जाऊन फाॅर्म भरून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अंतिम टप्प्यापर्यंत यातील किती मतदार घरूनच मतदान करण्याचा पर्याय निवडतात. हे मात्र आज निश्चित सांगता येणार नाही. 


मतदार केंद्रावर असणार सुविधा 


दरम्यान वृध्द व दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून अशा मतदारांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 


तृतीयपंथी मतदार फक्त दोनच 


निवडणूक विभागाकडून वृध्द, दिव्यांग मतदारांबरोबरच तृतीयपंथी मतदारांची संख्या सांगण्यात आली आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघात तृतीयपंथी मतदारांची संख्या फक्त दोन आहे. 


वयोगटनिहाय मतदारसंख्या अशी 


वयोगट- १०० - २१

वयोगट - १०१ -  ५७

वयोगट - १०२ - ११

वयोगट - १०३ -  ०७

वयोगट - १०४ -  १४१



भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांंपेक्षा जास्त वृध्द व ४० टक्के दिव्यांग असलेल्या मतदारांना प्रथमच घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार मतदारसंघात ८५ वर्षांंपेक्षा जास्त आयुर्मान असलेली मतदारसंख्या ५ हजार ५३१ तर दिव्यांग साडेतीन हजार व तृतीयपंथी मतदारांची संख्या दोन आहे.


- सुनील सावंत, तहसीलदार, वैजापूर


छाया स्त्रोत - गुगल 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top