एकाविरुध्द गुन्हा दाखल
पत्नीला छेडल्याचा जाब विचारणाऱ्या पतीला एकाने जबर मारहाण केल्याची घटना १५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास वैजापूर शहरालगत असलेल्या लाडगाव चौफुली परिसरात घडली.
याप्रकरणी राहुल गणेश शिंदे (रा.वैजापूर) याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील पीडित महिला ही पतीसह शहरालगत असलेल्या लाडगाव चौफुली परिसरात रहिवासास आहे. शुक्रवारी दुपारी महिला घरी असताना राहुल शिंदे हा तिच्या घरी आला व 'मला तुझ्यासोबत बोलायचे आहे, मी तुला खूप दिवसापासून पाहतो' असे म्हणून तिचा हात पकडून विनयभंग केला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिलेने आरडाओरड सुरू केली. यामुळे राहुल त्या ठिकाणाहून पळून गेला. दरम्यान या घटनेचा जाब विचारण्यासाठी पीडित महिलेचा पती राहुल शिंदे याला भेटला. त्यावेळी राहुलने महिलेच्या पतीला शिवीगाळ करून शॉकअपने जबर मारहाण केली. महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून राहुल शिंदे याच्याविरुद्ध विनयभंगासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छायास्त्रोत - गुगल