Wheat Thief | हार्वेस्टरने गहू सोंगून चोरून नेला; जुन्या भांडणाचे कारण

0

कापूसवाडगाव येथील घटना 



 जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी एकाच्या शेतातील गहू सोंगणी करुन चोरी केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील कापूसवाडगाव येथे शुक्रवारी घडली. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







वैजापूर तालुक्यातील कापूसवाडगाव येथील अमोल दिनकर थोरात व माऊली भगवान कदम हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांचे जुने भांडण आहे. या कारणावरून माऊली कदम व त्याच्या साथीदारांनी अमोल थोरात यांच्या शेतातील गहू हार्वेस्टर यंत्राच्या साह्याने सोंगणी करुन चोरून नेला.



 या १० क्विंटल गव्हाची किंमत २० हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी अमोल थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माऊली भगवान कदम, शरद भगवान कदम व एक अनोळखी इसम अशा तीन जणांविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात गहू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार मनोज कुलकर्णी  करीत आहेत.


छायास्त्रोत - गुगल 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top