Suspected Thief | दुकानात गेले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले, सोने पळविल्याचा संशय

0

नऊ महिन्यांपूर्वीची घटना 




 'सोने उजळून देतो' म्हणून महिलेचे  तीन लाख रुपये किंमतीचे दागिने घेऊन भामटे पसार झाल्याची घटना १४ जुलै २०२३ रोजी सकाळच्या सुमारास वैजापूर शहरातील मारवाडी गल्ली परिसरात घडली होती. दरम्यान या घटनेतील ते दोघे संशयित शहरात निदर्शनास आले असता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. 







 याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मारवाडी गल्लीतील रहिवासी  लता मदनलाल जैन या  घरी असताना १४ जूलै रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास दोघेजण त्यांच्या घराच्या गेटजवळ आले. आम्ही जैन आहोत. अशी ओळख त्यांनी दिली. त्यामुळे लता जैन यांनी त्या दोघांना घरात या म्हणून सांगितले. आत आल्यानंतर त्यांनी आदरातिथ्य करून विचारपूस केली. त्यावर भामट्यांनी आम्ही पितळ, तांबे, सोने,चांदी उजळून देतो म्हणून सांगून त्यांनी  तांब्याचे भांडे, चांदीचा तांब्या पॉलिश करून स्वच्छ करून दिले. दरम्यान तुमच्या गळ्यातील सोन्याची चैनही साफ करून देतो. असे त्यांनी सांगितले. महिलेने देखील ती चैन त्यांना दिली. 



भामट्यांनी चैन स्वच्छ करून एका बाजूला ठेवली तर तुमच्या हातातील सोन्याच्या दोन बांगड्या व अंगठी देखील साफ करून देतो. अशी थाप  मारून पितळाचा  बंद झाकणाचा डबा व त्यात दोन चमचे हळद टाकून आणा. असे सांगितले. डबा घेऊन त्यामध्ये दागिने व लिक्विड टाकले व पंधरा मिनिटे डबा गॅस शेगडीवर ठेवा. असे सांगितले. लता जैन यांनी त्यांच्या सुनेला बोलवले व तो डबा गॅसवर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही शेजारी जाऊन येतो. असे म्हणत दोघे भामटे तेथून पसार झाले. याप्रकरणी लता जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात  भामट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


ते दोघे आले अन् महिलेने ओळखले 


दरम्यान मंगळवारी दुपारी ते दोघे संशयित चोरटे पुन्हा वैजापूर शहरात आले होते. संस्थेसाठी देणगी जमा करीत असताना ते शहरातील पंचायत समितीच्या गळ्यातील एका दुकानात गेले असता दुकानदाराला संशय आला. त्यामुळे दुकानदाराने नातेवाईक असलेल्या लता जैन यांना दुकानात बोलावून घेतले. त्या तेथे आल्यानंतर फसवणूक करून सोने घेऊन जाणारे दोघे हेच असल्याचे सांगितले. तोपर्यंत नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. काही वेळाने पोलिसांनी तेथे येऊन दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान सोने चोरीच्या घटनेतील चोरटे हेच आहे किंवा नाही. याबाबत पोलिस यंत्रणा शोध घेत आहेत. परंतु ते चोरटे हेच आहेत. या निष्कर्षाप्रत पोलिस अद्याप पोहोचले नाही.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top