अंचलगाव येथील दुर्देवी घटना
घरगुती वादातून मातेने गावातील होळीत स्वतःलाच पेटवून घेतल्यानंतर घरात आलेल्या आईला वाचविण्यासाठी गेलेल्या सहा वर्षीय चिमुकली व बाजूलाच खाटेवर असलेल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीचाही होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २४ मार्च रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील अंचलगाव येथे घडली. दरम्यान या घटनेत पती - पत्नीही गंभीररीत्या भाजले असून ते दोघेही मृत्यूशी झुंज देत आहेत. घरात कापूस असल्यामुळे त्यालाही आग लागल्याने या घटनेत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून 'होळी' झाली आहे.
कल्याणी अप्पासाहेब कोकाटे (६ ) व सहा महिन्यांच्या चिमुकल्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. सहा महिन्यांच्या चिमुकलीचे नाव कळू शकले नाही. अप्पासाहेब आसाराम कोकाटे (वय ३२ वर्षे), पत्नी कोमल (वय २६ वर्षे, रा. अंचलगाव ता. वैजापूर) असे गंभीर भाजलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोमल व तिच्या जावेचे पाणी भरण्यावरून नळावर भांडणे झाली. त्यामुळे संतापाच्य भरात कोमल हिने गावातच घरासमोर असलेल्या होळीच्या आगीने स्वतःला पेटवून घेतल्यानंतर ती थेट घरात गेली असता घाबरलेल्या पती अप्पासाहेब कोकाटे व मुलगी कल्याणी या दोघांनीही कोमलला वाचविण्यासाठी धाव घेतली.
![]() |
भाजलेली कोमल कोकाटे |
तसेच घरातच कापूस असल्यामुळे कापसानेही पेट घेतला. तेथेच बाजूला एका खाटेवर या दांपत्याची सहा महिन्यांची मुलगीही होती. या घटनेत कल्याणी व सहा महिन्यांच्या चिमुकलीचा होरपळून मृत्यू झाला तर अप्पासाहेब व कोमल कोकाटे हे दांपत्य ५० टक्क्यांपेक्षाही जास्त भाजले आहेत. घरातील कापसाने पेट घेतल्याने घरातील साहित्य जळून खाक झाले. ही २४ मार्च रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान घटनेनंत सर्वांनाच रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु सहा महिन्यांच्या चिमुकलीला डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर गंभीर भाजलेल्या कल्याणीचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर शिऊर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला आहे. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
![]() |
मृत कल्याणी |
नेमके काय आहे सत्य ?
दरम्यान या घटनेबाबत वेगवेगळी चर्चा ऐकावयास मिळत आहेत. अप्पासाहेब हा अवैधरीत्या पेट्रोल, डिझेल विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने कोकाटे दांपत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. या कारणावरून दोघांमध्ये नेहमी खटके उडत होते. त्यामुळे कोमलने अंगावर पेट्रोल घेऊन स्वतःला पेटवून घेतले तर दुसरीकडे दोन जावांमध्ये पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून कोमलने घरासमोरील होळीतच स्वतःला पेटवून घेत घरात जाऊन पती अप्पासाहेब यांना मिठी मारली. या घटनेत वेगवेगळे मतप्रवाह असल्यामुळे नेमका खरा प्रकार काय आहे? हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे पोलिस यंत्रणाही बुचकळ्यात पडली असून ते कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाही.
![]() |
मृत सहा महिन्यांची चिमुकली |
घराचीही झाली 'होळी'
दरम्यान होळी सणाच्या दिवशी आगीने पतीसह पत्नी गंभीर भाजले तर होरपळून दोघी चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. होळीच्या दिवशी अख्ख्या घराचीच 'होळी' झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments