Toll plaza | समृद्धीवरील टोल प्लाझा 'वाऱ्यावर', वाहने धावताहेत फुकटात

0

पगार नसल्याने कर्मचारी गायब 



वैजापूर तालुक्यातून जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून गेल्या तीन दिवसांपासून अनेक वाहने टोलविना फुकट धावताना दिसली.टोलनाक्यावर  एकही कर्मचारी किंवा अधिकारी नसल्याने टोलनाका सुनसान पाहून अनेक वाहनचालकांना आनंद झाला आणि ते त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघाले. 









याबाबत अधिक माहिती अशी, वैजापूर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर असलेला जांबरगाव टोलनाका अनेकदा चर्चेत राहिला आहे. वैजापूर शहरासह अन्य अनेक वाहने बुधवारपासून समृद्धी महामार्गावरून जात असताना तेथे एकही कर्मचारी व अधिकारी उपस्थित नव्हता. टोलनाक्यावर येणाऱ्या वाहनांची नोंदणी किंवा पावती देणारे कोणी नव्हते. टोलनाक्यावर वाहने आल्यावर कोणीच दिसत नसल्याने वाहने तेथून निघून जाऊ लागले. त्यामुळे समृद्धी महामार्गाचे अर्थिक उत्पन्न बुडून मोठे नुकसान  झाले. 







तीन दिवसांपासून टोलनाक्यावर कोणीच नसल्याने शेकडो वाहने फुकटात गेली. टोल कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नसल्यानचे कारण कळू शकले नाही. त्याचप्रमाणे व्यवस्थापक व पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही फोनला प्रतिसाद दिला नाही. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने  टोल प्लाझा सोडून गेले. अशी चर्चा टोल प्लाझाजवळील हॉटेल आणि इतर दुकानदारांमध्ये सुरू होती. यापूर्वीही अनेकदा टोलनाक्यावरील कामगारांना पगार न दिल्याने प्रकरण चिघळले होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top