Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Police Helpline | 'तळीरामाने' दिली खोटी माहिती; पोलिसांनी घडविली अद्दल !

११२ क्रमांकावर दिली खोटी माहिती 



 

दारूच्या नशेत पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क करून खोटी माहिती देणे एका ५५ वर्षीय तळीरामाला  चांगलेच महागात पडले आहे. खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध वीरगाव ( ता. वैजापूर  ) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 







दत्तू साहेबराव टेमकर वय ५५ रा. महलगाव ता. वैजापूर असे आरोपीचे नाव आहे. वीरगाव पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पोलिसांनी आपत्कालीन व एखाद्या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना कळविण्यासाठी संपर्क न झाल्यास व तातडीची मदत मिळविण्यासाठी ११२ क्रमांकाची हेल्पलाईन सेवा पोलिस  दलाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. 



मात्र दत्तू टेमकर यांने मद्यधुंद अवस्थेत ११२  क्रमांकावर  फोन करून तक्रार नोंदविली होती. यानंतर वीरगाव ठाण्यातील पथक घटनस्थळी पोहोचल्यानंतर तक्रारदार  मद्यधुंद स्थितीत आढळून आल्याने  पोलिस हवलदार मनोज कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दत्तू टेमकर याच्याविरुद्ध  ११२ क्रमांकावर खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments