Gambling | ते 'तिर्रट' खेळत होते अन् पोलिसांनी टाकला छापा

0

 ३ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त 



वैजापूर शहरातील ( Vaijapur City ) परदेशी मढी परिसरात  सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर ( Gambling Den) सहायक पोलिस अधीक्षक ( Assistant Superintendent Of Police) महक स्वामी यांच्या पथकाने अचानक  छापा टाकून १८ जुगाऱ्यांना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन लाख ११ हजार रुपयांच्या मुद्देमालासह जुगाराचे साहित्य हस्तगत केले. याप्रकरणी वैजापूर पोलिसांत ( Vaijapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



वैजापूर पोलिसांनी शहरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून १८ जुगारी पकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम व अन्य मुद्देमाल जप्त केला.




वैजापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मढी परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांच्या पथकाने या अड्ड्यावर छापा टाकला असता संतोष उर्फ धोनी रामचंद्र राजपुत हा जुगार अड्डा चालवत असल्याचे निदर्शनास आले. अड्ड्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळताना १८ जण आढळून आले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कमेसह, मोटारसायकल, मोबाईल असा एकूण ३ लाख ११ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी प्रकाश चंद्रभान कुराडे , प्रवीण उत्तम कुमावत,अक्रम शेख रज्जाक,भरत बबन राऊत , सुभाष बबन फुलारे,विक्रम शिवसिंग राजपूत, राजेंद्र बंडू हंगे ,शाहरुख सबरार बेग , उल्हास नारायण लालसरे , गोकुळ राधाकृष्ण कोतकर , संतोष चांगदेव खैरनार,शिवप्रकाश रामदास फुलारे,शेख हाजी अब्दुल हकीम , अनिल सुखलाल राजपूत,शेख फय्याज शेख गणी , बबन अशोक शिंदे या १८ जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी, फौजदार श्रीराम काळे,  मोरे, पवार,मोटे ,जोनवाल , गायकवाड, कदम , जगताप यांनी ही कारवाई केली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top