Suicide | पंख्याला साडी बांधली अन् घेतला गळफास

0

वैजापूर येथील घटना 



वैजापूर शहरातील वानवडी परिसरात एका ३७ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. अंबादास वसंत बुट्टे (३७) असे घटनेतील मृताचे नाव आहे. 








याबाबत अधिक माहिती अशी की, अंबादास बुट्टे हे त्यांच्या आईसह वानवाडी परिसरात रहिवासास होते. ते शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कार्यरत होते. मागील काही दिवसापासून पत्नीशी त्यांचा कौटुंबिक वाद असल्याने ते विभक्त राहत. रविवारी सायंकाळी त्यांची आई घरी नसताना त्यांनी पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. ही घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास नातलागच्या निदर्शनास आली. 



उपचारासाठी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास  हवालदार ज्ञानेश्वर शिंदे करीत आहेत.

छाया स्त्रोत - गुगल 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top