वैजापूर शहरालगतची घटना
भरधाव जाणाऱ्या शिवशाही बसने पिकअपला समोरून धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात वैजापूर शहरातील येवला रस्त्यावरील विनायकराव पाटील महाविद्यालयाजवळ रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडला.
सागर उत्तम ठोंबरे (३५) व सोमनाथ निकम (४०) रा भोयगाव ता. चांदवड जि. नाशिक अशी जखमींची नावे आहेत. सागर ठोंबरे हे त्यांचा पिकअप (एम. एच. ४६ ए. जी. ३५०७) घेऊन येवल्याकडे जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या नाशिक - संभाजीनगर शिवशाही बसने (एम. एच. ०६ ई. डब्ल्यू ०३३४) पिकआपला जोराची धडक दिली. या अपघातात पिकअपमधील चालक सागर ठोंबरे व सोमनाथ निकम हे दोघे गंभीर जखमी झाले.जखमी दोघांना उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या अपघातात बस व पिकअपचे नुकसान झाले. या अपघाताची वैजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.