तरुणी घरी होती एकटीच
मतिमंद तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषीकेश भाऊसाहेब गायकवाड रा.परसोडा असे नराधमाचे नाव आहे.
घटनेतील पीडित तरुणी ही मतिमंद असून वैजापूर शहरात रहिवासास आहे. ०४ मार्च रोजी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील शांतीनगर परिसरात ऋषीकेश गायकवाड यांनी तरुणीवर अत्याचार केला. सदरची घटना पीडितेचे भावाला समजली. त्याने वैजापूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या घटनेबाबत पोलिसांत तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या दिलेल्या फिर्यादीवरून ऋषीकेश गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा अधिक तपास फौजदार एस. जे. शेख करीत आहेत.