Online Gambling | जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

0

५६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत 


वैजापूर शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकून जुगाराच्या साहित्यासह ५६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.








        याप्रकरणी शेख शाहरूख शेख रफिक रा.पाटील गल्ली व महेश बाबुराव शिंदे रा.शेकापूर ता.आष्टी जि.बीड या दोघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात असलेल्या स्वस्तिक टॉवरमधील  गाळ्यात ऑनलाईन जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधीक्षक (ग्रा.) यांच्या पथकाला मिळाली. या माहिती आधारे मंगळवारी दुपारी पथकाने स्वस्तिक टॉवरमधील एका गाळ्यात छापा टाकला असता तेथे शाहरूख व महेश हे दोघेजण लोकांकडून पैसे घेऊन कॉम्पुटरवर ऑनलाईन गेम, बिगो कॉईनगेम व सोरट जुगार खेळताना व खेळवितांना मिळून आले. पथकाने त्यांच्याकडून ६ हजार रुपयांच्या रोख रकमेसह जुगाराचे साहित्य असा एकूण ५६ हजार ४५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी या दोघा जुगारटयांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top