Pulse Polio Vaccination | २४,५४९ बालकांना 'एक बूँद जिंदगी का'

0

 वैजापूर तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद 



वैजापूर शहरासह ग्रामीण भागात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम  राबविण्यात आली. ० ते ५ वर्ष वयोगटातील अपेक्षित २५,१९५ बालकांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेऊन मोहीमेचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी सायंकाळपर्यंत २४,५४९ बालकांना लसीकरण करण्यात आले.








भारत देश पोलिओमुक्त आहे. परंतु काही देशांमध्ये अद्याप पोलिओ असल्याने तो पुन्हा परत येऊ शकतो. यासाठी पल्स पोलिओ मोहीम राबविली जात असून ० ते ५ वर्ष वयोगटामधल्या अपेक्षित २५,१९५ बालकांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेऊन मोहीमेचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी रविवारी २४,५४९ बालकांचे लसिकरण पूर्ण करण्यात आले. या मोहिमेसाठी तालुक्यातील २३२ बुथवर ५९८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या लसीकरण मोहिमेसाठी रेल्वे स्टेशन, बसस्टॉप तसेच वाड्यावस्त्यांवर फिरती मोबाईल पथके तयार करण्यात आली होती. या मोहीमेकरीता तालुका आरोग्य विभागाकडून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जनजागृतीपर पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आले होते. 



पल्स पोलिओ लसीकरणवेळी बुथवरील स्वयंसेवकांनी बाळाला हाताचा स्पर्श होणार नाही. याची काळजी घेताना तसेच डाव्या कंरगळीवर पेनने खूण करताना बाळाचा हात न पकडणे. याबाबात विशेष काळजी घेताना दिसले. या पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत ज्या बालकांनी ३ मार्च २०२४ रोजी डोस घेतला नसेल त्यांना आरोग्य विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या टिमव्दारे गृहभेटीमध्ये पुढील ५ दिवस घरोघरी जाऊन डोस देण्यात येणार आहे. याकरीता प्रत्येक टिमचे कार्यक्षेत्रनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. तरी पालकांनी पोलिओवर मात करण्यासाठी देशव्यापी मोहिमेत सहभागी होऊन बालकाला पल्स पोलिओ लसीकरण करुन घ्यावे. असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी जी.एस. इंदूरकर यांनी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top