Honor | 'महिलांनीच महिलांचा सन्मान करा'

0

न्या. उपाध्याय यांचे प्रतिपादन  



 महिलांनी एकमेकांना सन्मान ( Honour  ) दिला तर महिला दिन साजरा ( Women's Day) करण्याची गरज पडणार नाही. असे प्रतिपादन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. के. उपाध्याय यांनी वैजापूर न्यायालयाच्या प्रांगणात आयोजित महिला पंधरवाडा दिनाच्या निमित्ताने केले. 




वैजापूर येथील न्यायालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात बोलताना न्यायाधीश एस. के. उपाध्याय व अन्य प्रमुख.



 तालुका विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालय वैजापूरच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. औरंगाबाद येथील प्रधान जिल्हा न्यायाधीश विभा इंगळे, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम. ए. यांची यावेळी उपस्थिती होती. एस. के. उपाध्याय यांनी महिलांना बालसंगोपन व आरोग्य विषयक माहिती देताना सांगितले की, महिला ही दुसऱ्या महिलेला त्रास देणं हे दुःखदायक आहे. अशी प्रकरणे समोर आली तर मनाला वेदना होतात. त्यामुळे महिलांनी एकमेकांचा सन्मान करायला शिकले पाहिजे. 



याप्रसंगी दिवाणी न्यायाधीश व स्तर आर. एन. मर्क, एस. के. खान, व्ही. आर. कुळकर्णी, डॉ. प्रा. स्मिता काळोखे, अंजली जोशी, अंजली गायकवाड, तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. मुळे, न्यायाधीश आर. एम. नेरलीकर, न्यायाधीश आर. एम. कराडे न्यायाधीश डी. एस. पिसाळ, तहसीलदार सुनील सावंत, मुख्याधिकारी बी. यू. बिघोत, आसाराम रोठे, रियासत आली, प्रमोद  जगताप, सरकारी वकील नानासाहेब जगताप, के बी कदम, एस. एस. ठोळे, वकील संघ ग्राहक सहकारी सोसायटीचे चेअरमन सोपान पवार, नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. प्रदीप बत्तासे आदींसह न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top