Jumbo Gutkha Action | 'तो' कारने येत होता.. जाळ्यात अडकला.. अन् पोलिसांनी लाखोंचा गुटखा पकडला.!

0

साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त 


 

राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एकाकडून छत्रपती संभाजीनगर येथील पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने साडेसात लाख रुपये किंमतीच्या गुटख्यासह  १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. २२ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास सिल्लोड तालुक्यातील अजिंठा लेणीच्या पायथ्याशी पथकाने ही जंबो कारवाई केली आहे. 




छत्रपती संभाजीनगर येथील विशेष पोलिसांच्या पथकाने साडेसात लाख रुपये किंमतीच्या गुटख्यासह १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.



याप्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात अनिल भाऊसाहेब भोजने (रा.जामखेड, ता.अंबड जि.जालना) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती की, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांचे विशेष पथक शुक्रवारी रात्री गस्तीवर असताना जळगावकडून सिल्लोडच्या दिशेने इनोव्हा कारमधून (क्रमांक एमएच १३ एसी ५०५२)  एक इसम गुटख्याची चोरटी वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच पथकाने अजिंठा लेणीच्या पायथ्याशी एका हॉटेललगत सापळा रचला. 



रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास पथकाला माहितीतील वाहन येताना दिसले. वाहन अडवून पोलिसांनी चालकाला त्याचे नाव-गाव विचारले असता. त्याने त्याचे नाव अनिल भाऊसाहेब भोजने (रा.जामखेड, ता.अंबड जि. जालना)  असल्याचे सांगितले. परंतु वाहनातील मालाबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्याचा जवळपास सात लाख ६० हजार ४६० रुपये किंमतीचा गुटखा मिळून आला. यावेळी पथकाने वाहन व गुटखा असा एकूण बारा लाख ६० हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top