Crime | दोघींत वाद झाला.. 'तिने' पेट्रोल फेकले अन् 'त्या' चिमुकल्या होरपळल्या; गुन्हा दाखल

0

जावेविरुध्द गुन्हा; अंचलगाव प्रकरण 



 

जावेने घरात पेट्रोल फेकल्याने ते पणतीवर पडून अचानक आगीने भडका घेतल्याने दोन चिमुकल्यांसह दांपत्य होरपळल्याची घटना २४ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील अंचलगाव येथे घडली होती. या घटनेत होरपळून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता तर अप्पासाहेब व कोमल कोकाटे हे दांपत्य गंभीर भाजले होते. याप्रकरणी जावेविरुध्द शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






कल्पना सोमनाथ कोकाटे रा. अंचलगाव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, होळीच्या दिवशी कौटुंबिक वादातून कोमल कोकाटे हिने अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतल्याने सहा वर्षीय कल्याणीसह काव्या या दोन चिमुकलींचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील अंचलगाव येथे घडली होती. परंतु या घटनेला आता कलाटणी मिळाली असून पोलिसांनी घाटीत उपचार सुरू असलेल्या कोमल कोकाटे हिचा जवाब घेऊन गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणातील सत्यता समोर आली. 



कोमल ही त्या दिवशी रात्री घरात स्वयंपाक करीत असताना पती अप्पासाहेब व दीर या दोघांमध्ये पाणी भरण्यावरून वाद झाल्याने जावू कल्पना कोकाटे ही तेथे आली व  'तू माहेरहून काही आणत नाही' असे म्हणून भांडण करू लागली. त्यानंतर कोमलने तिचे बोल  ऐकल्यानंतर ती  समोरच्या रुममध्ये गेली. कोमलने  तिला 'जाऊबाई तू माझ्या माहेरच्यांना का बोलते ? असे विचारले असता कल्पना हिच्याकडे असलेले पेट्रोल तिने  घरात फेकल्याने ते देव घरातील पणतीवर पडल्याने त्याचा भडका झाला. 



परिणामी घरातील कापसासह अन्य साहित्याला आग लागून सर्वप्रथम आगीने कोमल हिला कवेत घेतले. तिला वाचविण्यासाठी गेलेल्या कल्याणी व  काव्या या दोन मुलींचा होरपळून मृत्यू झाला तर नंतर वाचविण्यासाठी गेलेल्या अप्पासाहेबसह  कोकाटे  हे दांपत्य गंभीररीत्या भाजले. या दोघांवरही छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कोमल कोकाटे हिने दिलेल्या फिर्यादीवरून कल्पना सोमनाथ कोकाटे हिच्याविरुध्द शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top