Molestation | दारू पिऊन 'त्याने' मारहाण करीत केला विनयभंग; गळ्यातील सोनेही हिसकावले

0

पाच जणांविरुद्ध गुन्हा 



घरामध्ये स्वयंपाक करीत असलेल्या महिलेचा दारू पिऊन विनयभंग करीत मारहाण केली व शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना वैजापूर  तालुक्यातील हडसपिंपळगाव  येथे घडली. पिडीत महिलेने याबाबत  तक्रार दिल्यानंतर पाच जणांविरुद्ध घरात जाऊन विनयभंग, मारहाण शिविगाळ करणे व गैर कायद्याची मंडळी जमवणे आदी आरोपाखाली वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे. 






प्रकाश सोनवणे, काशिनाथ सोनवणे, लक्ष्मी बनसोडे, कल्पना सोनवणे व प्रदीप बनसोडे ( सर्व रा. हडसपिंपळगाव ) अशी आरोपींची नावे आहेत.‌पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही स्वयंपाक करीत असताना प्रकाश सोनवणे हा दारुच्या नशेत घरात शिरला व त्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्रात असलेले तीन ग्रॅम वजनाचे पान काढून घेतले तसेच महिलेच्या पाकिटातील दोन हजार रुपये देखील काढून घेतले. 



महिलेने आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने महिलेशी असभ्य वर्तन करत विनयभंग केला तर त्याच्या अन्य साथीदारांनीही गैर कायद्याची मंडळी जमा करुन महिलेला मारहाण केली. तसेच शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार आहे. त्यावरुन सर्व आरोपींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक पाटील  करीत आहेत.


छायास्त्रोत - गुगल 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top