परसोडा येथील घटना
मद्यधुंद दिराने भावजयीचा विनयभंग केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील परसोडा येथे ०४ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दिराविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील पीडित महिला ही तालुक्यातील परसोडा येथे कुटुंबियांसह रहिवासास आहे. सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास महिलेचे दोन्ही मुले घरात असतांना तिचा दीर मद्यधुंद अवस्थेत तिच्या घरी आला. 'हे घर मला पाहिजे नाहीतर तुला जिवंत मारून टाकीन' असे म्हणून पीडितेचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.