Mobile Thief | भामट्याने मोबाईल चोरला अन् नागरिकांनी बेदम चोपले.!

0

वैजापुरातील घटना 


वैजापूर शहरातील नवीन भाजीमंडईत मोबाईल चोरी करताना एकाला नागरिकांनी पकडून चोप दिल्याची घटना घडली. याप्रकरणी  अनिल मोहन गुंजाळ ( रा.गांधीनगर, बीड) याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 






याबाबत अधिक माहिती अशी की, जुबेर युसूफ चाऊस हे व्यवसायाने चालक असून वैजापूर शहरातील भारतनगर येथे रहिवासास आहेत. दरम्यान रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ते त्यांचा लहान मुलगा व भाच्यासोबत येवला रोडलगत असलेल्या नवीन भाजीमंडईत भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले होते. भाजी खरेदी करत असताना पाठीमागून एकाने त्यांच्या खिशातून त्यांचा मोबाईल चोरी केला व तो मोबाईल लपवत असताना मोबाईल त्यांच्या मुलाजवळ  पडला. त्यांच्या मुलाने मोबाईल उचलून वडिलांकडे दिला. यावेळी जुबेर यांनी अन्य नागरिकांच्या मदतीने मोबाईल चोरट्याला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top