येवला रस्त्यावरील घटना
किरकोळ कारणावरुन वैजापूर येथील येवला रस्त्यावरील चिकन दुकानातील चाकू घेऊन व तेथील वजनाच्या पारड्याने मारहाण करुन एकाला गंभीर जखमी केले व त्याच्या सहकाऱ्याला चापटबुक्क्याने मारहाण केली. तसेच दगडाने उजव्या हातावर मारुन दुखापत केली.
या घटनेत प्रवीण संजय मरमट (रा. परसोडा) व फय्याज शेख गणी (रा. वैजापूर) हे दोघे जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास येवला रस्त्यावरील एका चिकन दुकानासमोर घडली. याप्रकरणी मरमट यांच्या फिर्यादीवरुन राहुल गणेश शिंदे (रा. वैजापूर) याच्याविरुद्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण मरमट हे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास चिकन आणण्यासाठी येवला रस्त्यावरील एका दुकानात गेले होते.
त्यावेळी आरोपी राहुल शिंदे हा वेगाने दुचाकी घेऊन आला म्हणून मरमट त्यास ओरडला असता आरोपीने 'तू मला काय बोलला" असे म्हणून शिवीगाळ केली व दुकानातील चाकू उगारुन वजनाच्या पारडे फेकून मारले. तसेच फय्याज शेख हे त्यास समजावून सांगत असतांना आरोपीने त्यांनाही दगडाने मारुन उजव्या हातावर दुखापत केली. अशी तक्रार पोलिसांत दिली आहे. त्यावरुन आरोपींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छायास्त्रोत - गुगल