वैजापुरातील चौघांचा समावेश
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी कृत्य करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या वैजापूर येथील चार अट्टल गुन्हेगारांना पोलिस अधीक्षकांनी एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.
गणेश इंद्रराज गायकवाड वय (३५ वर्षे रा. लक्ष्मीनगर, वैजापुर), चंदर गणेश शिंदे (वय २६ वर्षे रा. वडारवाडा, वैजापुर ), दिनेश प्रकाश शिंदे ( वय २४ वर्ष रा. रोटेगाव ता. वैजापुर) व किरण काकासाहेब शिंदे ( वय २३ वर्ष रा. रोटेगाव ता. वैजापुर) अशी तडीपार करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. या चौघांनीही वैजापूर उपविभागामधील वैजापूरसह शिऊर व वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हेगारी कृत्य केलेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिक्षक ( ग्रामीण ) मनीष कलवानिया यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याप्रमाणे गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध म्हणून या चौघांना एक वर्षाकरीता छत्रपती संभाजीनगर जिल्हयातून हद्दपार केले आहे.
तसेच गेल्या वर्षी २०२३ मध्ये वैजापूर उपविभागामधील पोलिस ठाण्यांच्या ज्द्दीहत गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या एकूण १४ जणांना महाराष्ट्र पोलिस कायदयाप्रमाणे कारवाई करुन एक वर्षाकरीता जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले होते. दरम्यान हद्दपारीचे प्रस्ताव सहायक पोलिस अधिक्षक महक स्वामी यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयात पाठविले होते. पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया, अपर पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधिक्षक महक स्वामी, पो.नि. शामसुंदर कौठाळे, सपोनि विजय नरवाडे, पोउपनि पवन राजपूत, शिवनाथ सरोदे यांनी ही कारवाई केली.
छाया स्त्रोत - गुगल