Court Order | 'त्या' सहा जणांना न्यायालयाने सुनावली शिक्षा

0

विवाहितेचा पैशांसाठी छळ 




  पैशांसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी वैजापूर न्यायालयाने पतीसह सहा जणांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली.‌ तसेच प्रत्येकी ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवस साधी कैद भोगण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने मारहाण, शिवीगाळ करणे व जीवे मारण्याची धमकी देणे या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता केली. प्रथम वर्ग न्यायाधीश व्ही.आर. कुलकर्णी यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. 






विजय सुखदेव आहिरे (पती २५), सुखदेव लक्ष्मण आहिरे (५५ सासरा), किशोर सुखदेव आहिरे (३० दीर), लताबाई सुखदेव आहिरे (४८ सासु) सर्व रा. बाभुळगाव ता. येवला, छायाबाई सुनील जगताप (३१ रा. भाटगाव ता. येवला) व पुनम किशोर आहिरे (२४ रा. बाभुळगाव) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील योगिता हिचे सन २०१३ मध्ये बाभुळगाव येथील विजय आहिरे याच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी तीन महिने योगिताला चांगली वागणूक दिली. परंतु त्यानंतर त्यांनी योगिताकडे घराचे काम करण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच मुलबाळ होत नाही म्हणून योगिताचा शारिरीक व मानसिक छळ सुरु केला व अंगावरील दागिने काढून घराबाहेर काढले. 



त्यानंतर योगिता ही आपल्या नातेवाईकांना घेऊन येवला पोलिस ठाण्यात गेली असता पोलिसांनी त्यांना महिला सुरक्षा समिती छत्रपती संभाजीनगर येथे जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार योगिता ही महिला सुरक्षा समितीकडे गेली. मात्र आरोपी हे येवला तालुक्यातील असल्याने समितीने त्यांना न्यायालयात फिर्याद देण्याबाबत समजावून सांगितले. त्यानुसार वैजापूर येथील न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली.‌ ॲड.‌सोपान पवार यांनी न्यायालयात फिर्यादीची बाजू मांडली. त्यांनी तिघांचे जवाब नोंदवले. यात फिर्यादीच्या मेहुण्यासह दोघांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. दोन्हीही बाजूंचे साक्षी पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना विवाहितेच्या छळप्रकरणी दोषी ठरवून कोर्ट उठेपर्यंत शिक्षा, प्रत्येकी ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवसांच्या साध्या कैदेचे आदेश दिले.


छाया स्त्रोत - गुगल 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top