Samruddhi Mahamarg | कार दुभाजकावर धडकली अन् चुराडा झाला.!

0

 तिडी शिवारातील घटना 


कारचे नियंत्रण सुटून ती दुभाजकावर धडकून दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील तिडी शिवारात घडली. जखमींमध्ये वडील व मुलाचा समावेश आहे. दरम्यान कारने अपघातानंतर तीन पटल्या मारल्या असून इंजिन तुटले आहे. 

 









 बाजार समितीचे माजी संचालक व भुसार व्यापारी सुरेश गोरक्षनाथ तांबे (५२) व रोहित सुरेश तांबे (२३) रा. वैजापूर अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) पाठविण्यात आले आहे.


 या अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुरेश तांबे व त्यांचा मुलगा रोहित हे दोघे कारने (एमएच ०४ एचयू ४३००) छत्रपती संभाजीनगर येथून वैजापूरकडे येत होते. त्यावेळी तिडीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी सुरक्षा कठडे तोडून दुभाजकावर जाऊन आदळली. त्यामुळे गाडीतील दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, महाराष्ट्र सुरक्षा बल व तात्काळ मदत पथकाने धाव घेऊन जखमींना कारच्या बाहेर काढून उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला रवाना केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top