धोंदलगाव येथील घटना
बायकोला सासरी नेण्यासाठी आलेल्या जावयाचा सासरच्या लोकांनी 'दबंग' पाहुणचार करून डोके फोडल्याची घटना वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी जावयाने दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या लोकांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परविन सय्यद (सासू), नुर हसन सय्यद (सासरा) रा. धोंदलगाव ता. वैजापुर, सजौ पठाण (मामी सासू) व फिरोज युसुफ सय्यद (मामेसासरा) दोघे रा. बिडकिन ता. पैठण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, शफिक रशीद सय्यद हा व्यवसायाने चालक असून कन्नड तालुक्यातील हतनूर येथील रहिवासी आहे. २०२१ मध्ये त्याचा विवाह तालुक्यातील धोंदलगाव येथील नूर सय्यद याच्या मुलीशी पार पडला. बायकोला दिवस गेल्याने सहा महिन्यांपासून ती माहेरीच होती.
दरम्यान शफिक हा शनिवारी दुपारी तीन वाजेच्या त्याची आई व चुलत भावासह बायकोला नेण्यासाठी सासुरवाडीत आला. त्यांना बघताच सासू परवीन हिने 'तुम्ही येथे कशाला आलात ? माझ्या मुलीला मी तुमच्यासोबत पाठवणार नाही' असे म्हणून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तर मामेसासु सजौ व तिचा पती फिरोज यांनी देखील 'तू येथून जातो का नाही?' असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या दरम्यान सासू परवीन हिने शफिकचे लाकडी दांड्याने डोके फोडले.