तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एकाला फायटरने मारहाण करून जखमी केल्याची घटना १४ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास वैजापूर शहरातील येवला रस्त्यावर घडली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम बनकर, आकाश शर्मा व विशाल राऊत (सर्व रा.वैजापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल शरदराव साळुंके (रा.पाटील गल्ली) याचा ट्रान्सपोट्रींगचा व्यवसाय आहे. गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास डिझेल भरण्यासाठी तो येवला रस्त्यावरील पेट्रोलपंपाकडे जात होता.
दरम्यान पुलाजवळ त्याचा मित्र मिथुन बहिरट याचे शुभम बनकर याच्याशी वाद सुरू होता. तिथे थांबून राहुल याने मिथुनला 'काय झाल?' अशी विचारणा केली. यावेळी शुभम याने 'तू कशाला थांबला ? तुझं काय देणं घेणं आहे' असे म्हणून शुभम आणि त्याच्यासोबत असलेले मित्र विशाल राऊत व आकाश शर्मा या दोघांनी राहुलला लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली तर शुभमने राहुलच्या डोक्यात फायटर मारून त्यास जखमी केले.
छायास्त्रोत - गुगल