अधिकाऱ्यांच्या ३० पथकांची नियुक्ती
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची ३० पथके नियुक्त केले आहे. या पथकातील अधिकाऱ्यांवर विविध कामांची जवाबदारी सोपविण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते. असे गृहीत धरून प्रशासकीय अधिकारी कामाला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर सहायक निवडणूक अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांनी शहरातील विविध प्रशासकीय कार्यालयप्रमुखांच्या ३० अधिकाऱ्यांची वेगवेगळी पथके गठीत केली आहे. याशिवाय या पथकप्रमुखांच्या सोबतीला अन्य चार ते पाच अधिकारी व कर्मचारी देण्यात आले आहे. वैजापूर शहर व ग्रामीण भागासाठी वेगवेगळी पथके असणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने या पथकाने सभा, बैठका वाहनांच्या वापरावरील निर्बंध,पेड न्यूज,पक्ष व उमेदवारांच्या आचारसंहिता विषयक बाबी, बॅनर,पोस्टर ध्वनीक्षेपक आदी बाबींवर देखरेख ठेवणे, आचारसंहितेच्या दृष्टिकोनातून स्थिर, फिरते, व्हिडिओ पाहणी व संरक्षण पथकावर नियंत्रण ठेवणे.
आचारसंहिता भंग झाल्यास गुन्हा दाखल करणे. सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास दैनंदिन कामाचा अहवाल सादर करणे,नामनिर्देशनपत्र तपासणी कामासाठी सहकार्य करणे, मतदान केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांच्या नेमणुका / वॉरंट तयार करून तामिळ करणे,अभिलेख जतन करणे, पीआरओंना ओळखपत्र देणे.भोजन वाहन व अन्य व्यवस्था पाहणे आदींसह निवडणुकीच्या अनुषंगाने या पथकप्रमुखांवर जवाबदारी सोपविण्यात आली आहे.
नियुक्त केलेल्या पथकप्रमुखांची नावे अशी :-
गटविकास अधिकारी - आचारसंहिता पथक,व्ही.यू. करमणकर - सहा.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास सहाय्य करणे,एस.ई.इथापे - मतदान केंद्रध्यक्ष व मतदान अधिकारी नेमणूक कक्ष, हेमंत उशीर - मतदान पथक व पीआरओ प्रशिक्षण व्यवस्था,भागवत बिघोत - निवडणूक निरीक्षकांची व्यवस्था कक्ष, ए. सी. रोडगे - स्ट्रॉंगरूम, ईव्हीएम,व्हीव्ही पॅट कक्ष, के. एम. नारखेडे - एक खिडकी पथक, के. के. बहुरे-झोन व रूट व वाहन व्यवस्था नियोजन कक्ष, संतोष इथापे व ए. व्ही. पवार - क्षेत्रीय अधिकारी व मास्टर ट्रेनर नियोजन पथक, व्ही. एस. ठक्के व एस. के. पाटणी - टपाली मतपत्रिका व निवडणूक कार्य प्रमाणपत्र कक्ष, डी. बी. त्रिभुवन - निवडणूक साहित्य कक्ष, के. जे. कुलकर्णी- मतदार यादी कार्यप्रत कक्ष, एस. आर. ताठे - उमेदवार खर्च कक्ष, पी. टी. पेटारे - इतिवृत्तांत व मीडिया कक्ष, एस. ए. इथापे - स्वीप जनजागृती व मतदार मदत कक्ष आणि निवडणूक लेखा व मानधन कक्ष, अतुल बने - निडणूक विषयक पत्रव्यवहार कक्ष, डी. बी. त्रिभुवन - स्टेशनरी मागणी व पुरवठा कक्ष, आर. एस. चंदेल - आवक जावक विभाग, सुनील विश्वासू - ओळखपत्र वाटप कक्ष यांच्यासह ३० ते ३५ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.