इगतपुरीतून पोलिसांनी घेतले ताब्यात
'ते' तिघेही अल्पवयीन आहेत. एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीसह दोन्ही मुलेही अल्पवयीन आहेत.
वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील एका अल्पवयीन मुलीचे २६ मार्च रोजी अपहरण झाले होते. याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करीत दोन दिवसांत हॉटेल पॅराडाईज (इगतपुरी जि. नाशिक ) येथून पीडित मुलगी व मुलांना २९ मार्च रोजी ताब्या घेतले.
तिचा जबाब नोंदविला असता तिने सर्व आपबीती पोलिसांना सांगीतली. पीडीत अल्पवयीन मुलीस दोघांनी फुस लावून पळवून नेऊन तिच्यावर ठिकठिकाणी बलात्कार केला. वैजापूर शहरातील देखील एका लाॅजवर तिच्यावर बलात्कार केला. दोघा मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते अल्पवयीन आहेत.