शिक्षणावर पुन्हा प्रश्नचिन्ह
विजय गायकवाड | सत्यार्थी
वैजापूर तालुक्यातील शिऊर परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या ( Z P School ) एका 'तळीराम' मास्तराने ( Teacher ) शाळेचे 'मदिरालय' (Winery ) केल्याचा प्रताप उघडकीस आल्यानंतर शिक्षण व्यवस्थेचे ( Education System ) धिंडवडे निघाले आहे. या प्रकारामुळे सरकारी शाळेतील ( Government Schools) शिक्षक व शिक्षण व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उत्तम शिक्षणासाठी सधन कुटुंबातील मुलांना खासगी शाळांचा ( Private School ) पर्याय नेहमीच उपलब्ध असतो. परंतु खासगी शाळांची गडगंज शैक्षणिक शुल्क ( Education Fees ) हे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील पाल्यांसाठी आवाक्याबाहेरचे असते. या पार्श्वभूमीवर शासनाच्या जिल्हा परिषद शाळा हा शहरासह ग्रामीण भागातील मुलांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. परंतु बुहतांश जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा स्तर खालावलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी पटसंख्या देखील कमी होत चालली आहे . या शाळांत शिक्षकांची भरती गुणवत्तेनुसार नव्हे तर कायदेशीर तरतुदीनुसार ( Legal Provisions) करण्यात आलेली असते.
ग्रामीण भागातील पालक उपजीविकेसाठी दिवसभर वणवण करीत असल्याने शाळेत नेमके चालते तरी काय ? कोणत्या विषयाचा शिक्षक कोणता विषय शिकवतोय याबाबत त्यांनादेखील काहीही माहीत नसते. एकंदरीत काय तर सर्व काही शिक्षकांच्या भरशावर पाल्यांना शाळेत सोडून त्यांची जगरहाटी सुरू असते. शाळेकडे फिरकायला त्यांना वेळ नसतो. परिणामी सुधीर देशमुख सारखा मास्तर हीच संधी साधून शालेय मंदिराचे 'मदिरालय' बनवून तेथे 'एकच प्याला' ( Ekach Pyala ) रिचवत बसतो. वस्तीशाळा म्हटल्यावर तिकडे ना शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी फिरकतात ना गावातील कारभारी. सर्व रान मोकळेच असते.
नाही म्हणायला वस्त्यांवर राहणाऱ्यांना फारसी माहितीही नसते अन् तिकडे जायला वेळही नसतो. परंतु असे असले तरी ज्या ज्ञान मंदिरात ज्ञानार्जन केले जाते. नोकरीच्या माध्यमातून हजारो रुपये वेतन मिळून उदरनिर्वाह चालतो. त्या ठिकाणी रोज मद्यप्राशन करून येणे. हे देशमुख सारख्या अनुभवी शिक्षकाला शोभते का? जिल्हा परिषद शाळा असली म्हणजे काय झालं? देशमुखी थाट तिथेही असायला हवा का? असेही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात. 'सुधीर' म्हणजे अतिशय ज्ञानी, विचारशील व बहादूर असा होतो. परंतु देशमुख याने उलट प्रताप करून स्वतःच्या नावालाच काळीमा फासली आहे. शाळेचा 'बार' बनवून बहादुरी दाखवली. वरिष्ठ अधिकारी चौकशी करून भलेही कारवाई करतील. परंतु केवळ कारवाईमुळे अशा मास्तरांचे उपदव्याप संपणार नाही. हा प्रकार एका शाळेवर उघडकीस आला. याचा अर्थ उर्वरित शाळांमध्ये सर्वकाही आलबेल आहे का? हाही प्रश्न आहेच.
सांगायचा तात्पर्य एवढाच की, ज्या व्यवस्थेत शिक्षकांना गुरूस्थानी मानले जाते. त्यांनी जर पातळी सोडली तर 'शिक्षणाच्या आयचा घो' म्हणण्याची वेळ पालकांसह विद्यार्थ्यांवर येईल. त्यामुळे पालकांसह शैक्षणिक क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सजग राहणे तेवढेच महत्त्वाचे आहे. गुरूजीमंडळींनीही कोणतीही गोष्ट सहजतेने घेऊन चालणार नाही. सध्या ॲड्राँईड मोबाईलचे युग आहे. त्यामुळे कोणताही उपदव्याप कराल तर लगेचच कॅमेऱ्यात कैद व्हाल. प्रत्येकाला वैयक्तिक आयुष्य असते. परंतु वैयक्तिक व सार्वजनिक आयुष्यातील फरक न समजण्याएवढे गुरूजी नक्कीच खुळे नाहीत.
पालकही तितकेच जबाबदार
सुधीर देशमुख हा गेल्या अनेक दिवसांपासून मद्यप्राशन करून येत असल्याच्या तक्रारीही पालकांसह शाळेतील विद्यार्थ्यांनी केल्या. याचाच अर्थ तळीराम देशमुख याचा प्रताप माहिती असूनही पालकांनी त्याला पाठीशी घातले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तेव्हाच तक्रार करून ही बाब निदर्शनास आणून दिली असती तर ही वेळ आलीच नसती. त्यामुळे याला पालकही तितकेच जबाबदार म्हणावें लागतील.