Molestation | 'ती' रस्त्याने जात होती अन् पतीने केला विनयभंग

0

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 


 

रस्त्याने पायी जात असताना  पत्नीचा हात पकडणाऱ्या  नवरोबाविरुद्ध ( Husband ) वैजापूर पोलिस ठाण्यात ( Vaijapur Police Station ) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेतील पीडित महिला ( Victimized Women ) ही चार वर्षांपासून पतीपासून विभक्त (Separate ) राहत असून या घटनेपूर्वीही तिने पतीविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून एक गुन्हा न्यायप्रविष्ट आहे. 








    याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील पीडित महिला ही वैजापूर शहरातील रहिवासी असून तिचा काही वर्षांपूर्वी येथीलच एका तरुणाशी विवाह पार पडला. लग्नानंतर काही दिवस पतीने तिला बऱ्यापैकी नांदविले. परंतु त्यापुढील काळात तो तिचा मानसिक व शारीरिक छळ करू लागला. यामुळे पीडित महिलेने वैजापूर पोलिस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दिली होती.




 त्यावरून पतीविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला. यानंतर माहेर शहरातच असल्याने मागील चार वर्षांपासून ती माहेरीच राहू लागली. दरम्यान ०८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पीडित महिला ही पायी जात असताना तिच्या पतीने इच्छेविरुद्ध तिचा हात पकडला व 'तू कोर्टात दाखल केलेला ४९८ चा गुन्हा मागे घे नाहीतर तुला जीवंत मारून टाकीन' अशी धमकी दिली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top